Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रद्धा धाडीवाल या मुलीने रेखाटली जिवंत रांगोळी

भगवान पार्श्‍वनाथ स्वामींच्या रांगोळीने अनेकांचे घेतले लक्ष वेधून

शिर्डी/प्रतिनिधी ः येथील कु.श्रद्धा सुनील धाडीवाल या मुलीने पार्श्‍वनाथ भगवान स्वामीची ध्यानमूर्तीचे रांगोळी मध्ये अतिशय रेखीव व जिवंत चित्र रेखा

कोतुळेश्‍वर विद्यालयाचे कबड्डी स्पर्धेत यश
पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा
केडगावच्या दोघांची पोलिसांनी केली चौकशी ; पत्रकार बोठेला मदत केल्याचा संशय

शिर्डी/प्रतिनिधी ः येथील कु.श्रद्धा सुनील धाडीवाल या मुलीने पार्श्‍वनाथ भगवान स्वामीची ध्यानमूर्तीचे रांगोळी मध्ये अतिशय रेखीव व जिवंत चित्र रेखाटित आपल्या अध्यात्मिक भावनांना उजळीत मनस्वी आनंद व्यक्त केला. शहरातील जैन बांधव भगिनींसह राहता ग्रामस्थांनी या सुरेख रांगोळीचे भरभरून कौतुक करीत श्रद्धाच्या कलेचा गौरव केला.
राहता येथील किराणा व्यापारी सुनील पोपटलाल धाडीवाल यांची कन्या कु. श्रद्धा ही संजीवनी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने बीएससी मायक्रो बायोलॉजी पर्यंत शिक्षण पूर्ण केले .शिक्षण घेत असताना चित्रकलेच्या आपल्या आवडीतून तिने आपल्या बोटांनी विविध छोटी छोटी स्केच चित्रे रेखाटली त्यामुळे तिचा आपल्या कलेतील आत्मविश्‍वास वाढला. आई उज्वला व मामा अतुल देठीया यांच्या मार्गदर्शनातून तिने आपली कला रांगोळी चित्रात विकसित केली. श्रद्धांने नुकतीच आपल्याच घरातील हॉलमध्ये पार्श्‍वनाथ भगवान स्वामीची भव्य रांगोळी रेखाटली या रांगोळीत कलात्मकता, रंगसंगती व जिवंतपणा अफलातून पहावयास मिळाला. श्रद्धाने ही रांगोळी तब्बल तेरा तासात पूर्ण केली. यासाठी तिने सुमारे तीन किलो रांगोळीचा वापर केला. तिने यापूर्वी अनेक स्केचेस व स्मेशील आर्टच्या माध्यमातून विविध चित्र रेखाटले असून अनेक भेटकार्डही बनवून आलेल्या विक्रीतून शिक्षणास हातभार लावला. ही रांगोळी पाहण्यासाठी शहरातील अनेक मान्यवरांनी व ग्रामस्थांनी भेट देऊन श्रद्धा हिच्याकलेचे कौतुक केले जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अनिल पिपाडा, डॉक्टर के वाय गाडेकर पतसंस्थेचे चेअरमन डॉ. स्वाधीन गाडेकर, जैन महिला संघाच्या अध्यक्ष सुजाता पिपाडा, डॉ. मंगला गाडेकर,तुषार मुथा, वीरेश रुणवाल, नेमीचंद लोढा, महावीर पिपाडा, सुमतीलाल ताथेड, पारस पिपाडा, चोरडिया परिवार यासह अनेकांनी श्रद्धाचा सत्कार करीत तिच्या भावी कलेला शुभेच्छा दिल्या.

COMMENTS