इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरची बारामती करणार हि जाहीर भाषणं आपण अनेक निवडणुकीत ऐकली आहेत. ती खर्या अर्थाने स्वप्ने होती. हे या शहरातील मत
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरची बारामती करणार हि जाहीर भाषणं आपण अनेक निवडणुकीत ऐकली आहेत. ती खर्या अर्थाने स्वप्ने होती. हे या शहरातील मतदारांना लक्षात आले आहे. यामुळे बारामतीची स्वप्ने दाखविणार्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा बारामतीचा विकास काय असतो हे मी प्रत्यक्षात करुन दाखवितो, एक संधी द्या, असे आवाहन निशिकांत प्रकाश भोसले-पाटील यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघात प्रचार दौर्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी इस्लामपूर शहरातील निनाईनगर, अक्षर कॉलनी, नेहरू कॉलनी, दत्तनगर, शिराळा नाका आदी भागातील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच त्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, आ. जयंत पाटील यांनी या शहरातील व मतदार संघातील मतदारांना प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी स्वप्ने दाखविली. गेली 35 वर्षे जनतेने विश्वास टाकला. मात्र, अपेक्षीत असा या शहराचा व मतदार संघाचा विकास झाला नाही, इस्लामपूर शहरातील एमआयडीसीचे आधुनिकरण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. यामुळे बेरोजगारी प्रश्न निर्माण झाला. शहरातील तालुका क्रीडा संकुलाची काय अवस्था आहे. सिंग्नल यंत्रणा, भाजीपाला मार्केट, पार्कींग व्यवस्था असे अनेक प्रश्नामुळे येथील नागरिक हैराण आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी का पुढाकार घेतला नाही. 35 वर्षाचा काळ हा त्यांच्या नातेवाईक व बगलबच्च्या विकासासाठी घालवला. हे सत्य आज कोणी नाकारु शकत नाही.
शहराला जोडणारे रस्ते, स्ट्रीट लाईट, सिंग्नल व्यवस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण, अंतर्गत रस्ते हे महायुती सरकारच्या काळात पुर्णत्वाकडे गेले, भुयारी गटरला निधी मंजुर झाला, एकदा संधी द्या 35 वर्षात रखडलेला विकास पाच वर्षात पुर्ण करुन दाखवितो. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS