पुणे ः विजय शिवतारे हे बारामतीतून अद्यापही ठाम आहेत. त्यांनी आणखी एक प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला आहे. आपण भाजपचा उमेदवार म

पुणे ः विजय शिवतारे हे बारामतीतून अद्यापही ठाम आहेत. त्यांनी आणखी एक प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला आहे. आपण भाजपचा उमेदवार म्हणून बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान विजय शिवतारे म्हणाले की, महायुतीला विनंती करुन जर शिवसेनेने बारामतीची जागा मिळवली तर धनुष्यबाण या चिन्हावर आपण ही निवडणूक जिंकू शकतो, अशी माहिती मी वरिष्ठांना दिली असल्याचे शिवतारे म्हणाले.
COMMENTS