Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सशक्त नौदलाची संकल्पना शिवरायांची

पंतप्रधान मोदी ः शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

सिंधुदुर्ग ः छत्रपती शिवाजी महाराज यांना माहिती होते की, सागरी किनार्‍यावर नियंत्रण असले तर देशावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे त्यांनी अनेक योद

रेल्वेच्या 85 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी
इंडिया आघाडीची 4 जूनला ‘एक्सपायरी डेट’
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्ली मेट्रोमधून प्रवास

सिंधुदुर्ग ः छत्रपती शिवाजी महाराज यांना माहिती होते की, सागरी किनार्‍यावर नियंत्रण असले तर देशावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे त्यांनी अनेक योद्धांना येथे तयार केले. तेच योद्धे सर्वांना प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन भारत गुलामगिरीच्या मानसिकतेून बाहेर पडून भारताचा विकास होत आहे. शिवरायांनीच नेव्ही अर्थात नौदलाची संकल्पना मांडली, नुसती मांडलीच नाही तर, त्यांनी सागरी किनार्‍यावर सैन्य, गडकिल्ले बांधून देशाच्या सीमा सशक्त करण्यावर भर दिल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी सिंधुदुर्गात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. पुतळ्याचे अनावर केल्यानंतर त्यांनी आर्ट गॅलरीची देखील पाहणी केली.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, पुर्वीचे सरकार हे समुद्री किनार्‍यावरील लगत गावांना आपले मानत नव्हते. त्यामुळे सी-सेक्टर लगत असलेल्या गावांसाठी या सरकारने विकासाचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात मस्त्यउद्योग देखील 80 टक्के वाढला. त्याचबरोबर सागरमला योजनेच्या माध्यमातून संपूर्ण किनारपट्टीवर सुविधा पुरवल्या जात आहेत. सिंधुदुर्गाचा ऐतिहासिक किल्ला, सर्वत्र पसरलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप, हा सर्व भारत वासीयांना प्रेरणा देणार आहे. ’बढो नया कमाल हो, झुको नही, रुको नही, बढे चलो, बढे चलो, असे म्हणत त्यांनी नौदला शुभेच्छा दिल्या. मातृभूमीसाठी समर्पण दिलेल्या सैनिकांना त्यांनी नमन केले. मोदी म्हणाले की, सिंधुदुर्गाच्या ऐतिहासीक किल्ल्याला पाहून सर्व भारतीयांना गर्व वाटतो.

आज घर-घर मोदींचा अनुभव ः मुख्यमंत्री शिंदे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नौसेना दिवस आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण या प्रसंगी उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी स्वागत करतो. पहिले हर घर मोदी असे म्हटले जात होते. आज घर घर मोदी हा अनुभव पाहायला मिळाले. मोदीजींचे संपूर्ण जगभरात नाव झाले आहे. केंद्रीय आणि राज्याच्या सहयोगाने महाराष्ट्राचा विकास होत आहे. असे शिंदे म्हणाले. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेले स्वराज्य सुराज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्माण करत आहे. जगाला भारताचे सामर्थ्याचे दर्शन घडवण्याचे हे काम आहे. बलशाली भारत ही आमची नवीन ओळख आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

गड किल्ले संवर्धनाची जबाबदारी सरकारची – छत्रपती शिवरायांच्या काळातील जे किल्ले बनवले गेले. त्याचे संवर्धन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार बांधिल आहे. त्यासाठी करोडो रुपये खर्च केला जात आहे. येथून आपल्याला विकसित भारताची वाट पाहायची आहे. तर पर्यटनातून मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाला देखील गती मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी पुढे म्हणाले की, देशातील लोकांचे सिंधुदुर्गाप्रती प्रेम निर्माण होत आहे. जनसामान्य या देवभूमीशी जोडले जात आहे. नेव्ही संकल्पना ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरु केली. हे देखील विदेशवासियांना कळेल.

नौदलाच्या गणवेशावर आता शिवरायांची राजमुद्रा – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणत्याही देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. त्यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आले, हे माझे भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावे देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.

COMMENTS