मुंबई : कोकणातील शिवसेनेचा महत्वाचा शिलेदार अर्थात राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टा
मुंबई : कोकणातील शिवसेनेचा महत्वाचा शिलेदार अर्थात राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे. कारण ठाकरे यांच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपर्कात असल्यामुळे ते लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे जर त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का असेल.
नुकताच खासदार शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत सत्कार केल्यानंतर ठाकरे गटाने खा. शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच ऑपरेशन टायगरमुळे आदित्य ठाकरेे यांनी दिल्लीला रवाना होणे पसंद केले आहे.
केंद्रात भाजपला खासदारांची गरज
केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत नाही, त्यामुळे नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर सरकार आहे. अशावेळी नितीशकुमार कधीही दगा देवू शकतात, याची स्पष्ट कल्पना केंद्रातील वरिष्ठ नेत्यांना असल्यामुळे त्यांच्या नजरा महाराष्ट्रातील खासदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या खासदारांकडे वळल्या आहेत. त्यातच शिंदे गटाचे मंत्री उदय सांमत यांनी ठाकरे गटाचे बरेच नेते संपर्कात असल्याचा बॉम्ब टाकल्यामुळे आपॅरेशन टायगर यशस्वी कधी होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यातच पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई टाळण्यासाठी दोन तृतीयांश खासदारांचा गट वेगळा होऊन बाहेर पडण्याची गरज आहे. ठाकरे गटाकडे एकूण नऊ खासदार आहेत. शिंदे गटाला यापैकी दोन तृतीयांश म्हणजे 6 खासदारांना सहीसलामत आपल्या गोटात आणण्याची गरज आहे, त्यामुळे सहा खासदार गळाला लावण्यात येत आहेत.
COMMENTS