Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनशक्तीच्या दबावासमोरही शिवसेनेची लढत अखंड

नांदेड उत्तरात ‘चाळीस मावळ्यांची’ झुंज-आ. बालाजी कल्याणकरनांदेड । प्रतिनिधीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रचंड धन

घराणेशाहीच्या आरोपांना मतदारांचा छेद : स्वामी व गाडीवाले कुटुंबांना पुन्हा स्पष्ट कौल
मुंबई जिंकली, पण महापौर कोण? भाजप-शिंदे सेनेत पडद्यामागे हालचाली सुरू
शाई पुसून गैरकृत्य करणार्‍यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

नांदेड उत्तरात ‘चाळीस मावळ्यांची’ झुंज-आ. बालाजी कल्याणकर
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रचंड धनशक्तीच्या दबावासमोरही आ. बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवारांनी अखेरपर्यंत धैर्य आणि निर्धाराने लढत दिली. पत्रकार परिषदेत कल्याणकर म्हणाले, हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारतो; मात्र ही निवडणूक संघर्षाची, आत्मसन्मानाची आणि जनशक्तीची होती.
कल्याणकरांनी सांगितले की, धनशक्तीसमोर झुकण्याऐवजी जनशक्तीच्या बळावर शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे आमचे चाळीस मावळे थकले नाहीत-हेच या निवडणुकीचे खरे यश. सर्व उमेदवार सामान्य कुटुंबातून आले होते, परंतु कुणीही हार मानली नाही. विजय-पराजय हा लोकशाहीचा भाग आहे; पण संघर्ष प्रामाणिक असला पाहिजे-तो शिवसेनेने केला. नांदेड उत्तरातील अनेक प्रभागांत शिवसेनेचे उमेदवार चार हजारांहून अधिक मते घेऊन दुसर्‍या क्रमांकावर राहिले. मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, दहा ते पंधरा जागा मिळणे अपेक्षित असले तरी हा निकाल पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना कल्याणकर म्हणाले की, नांदेड उत्तरात आतापर्यंत सुमारे 3,000 कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत आणि येत्या चार वर्षांत उर्वरित कामे पूर्ण करताना संघटन अधिक मजबूत केली जाईल. कल्याणकर म्हणाले, मी एकट्याने लढलो; पण ही लढत माझी नव्हे-ती शिवसैनिकांची होती. विरोधकांनी साम, दाम, भेद, दंड नीती अवलंबली; तरीही आम्ही झुकलो नाही. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेचे चारही आमदार एकत्र बसून संघटित निर्णय घेतील. पक्षांतर्गत मतभेदांबाबत बोलताना, मनभेद नाहीत; किरकोळ मतभेद संवादातून मिटवले जातील. प्रभाग क्रमांक तीनमध्ये पक्षाच्या भूमिकेविरुद्ध काम झाल्याच्या तक्रारीबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल. कल्याणकर म्हणाले, शिवसेना हा बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे; दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळणे हीच आमची परंपरा. भाजपाचे दोन बलाढ्य उमेदवार प्रभाग क्रमांक आठमध्ये पराभूत का झाले याचे आत्मपरीक्षण भाजपाने करावे, असेही त्यांनी आवाहन केले.  या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष गंगाधर बडूरे, उमेश मुंडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अपर्णाताई नेरलकर, बापूराव गजभारे, प्रफुल्ल सावंत, एकनाथ कल्याणकर आणि नवनिर्वाचित नगरसेवक सुहास कल्याणकर, योगेश मुंडे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम उपस्थित होते.
एमआयएमचा यश आणि अदृश्य शक्तीचा प्रश्न
नांदेड महापालिकेत एमआयएमच्या उमेदवारांचे यश अनेक राजकीय विश्लेषकांसाठी विचाराचा विषय आहे. काही तज्ज्ञ म्हणतात की, एमआयएमच्या पाठीमागे काही अदृश्य शक्ती किंवा आघाड्या काम करत असल्याचे संकेत दिसत आहेत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, महापालिकेत विविध आघाड्यांचा प्रयोग करून एमआयएमला पुढे आणण्याचे प्रयत्न जनतेला ठाऊक आहेत. यामुळे आगामी निवडणुका आणि स्थानिक राजकारणावर त्याचा प्रभाव कसा पडतो, हे पुढील काळात स्पष्ट होईल, अशी राजकीय चर्चा सुरू आहे.

COMMENTS