शिवसेनेचे गोंधळलेले राजकारण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेचे गोंधळलेले राजकारण

शिवेसेनेचे अलीकडचे राजकारण भांबावलेले राजकारण दिसून येत आहे. गोंधळलेल्या स्थितीत घेतलेले निर्णय पक्षाच्या पुढील राजकारणांवर प्रभाव पाडत असतात. महाविक

माथाडी कामगारांसाठी विविध उपक्रम राबवावेत – संभाजी कदम
शिवसेना नेत्यांच्या चौकशांना लागणार ब्रेक..? उद्धव ठाकरे-अमित शहांची होणार भेट
गोव्यात युतीची गरज नाही, पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार (Video)

शिवेसेनेचे अलीकडचे राजकारण भांबावलेले राजकारण दिसून येत आहे. गोंधळलेल्या स्थितीत घेतलेले निर्णय पक्षाच्या पुढील राजकारणांवर प्रभाव पाडत असतात. महाविकास आघाडीतून बाहेर पडत, एनडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना दिलेला शिवसेनेने पाठिंबा यातून शिवसेना महाविकास आघाडीतील पक्षापासून दूर जात असतांनाच, ती एनडीएपासून देखील केव्हाच दूर गेलेली आहे. त्यामुळे शिवसेनेला आता कोणता पक्ष स्वीकारेल. असा प्रश्‍न निर्माण होतो.
राज्यात 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तानाटय चांगलेच रंगले. त्यानंतर शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत, महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण दिले. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेने कडव्या हिंदुत्व विचारसरणीचा अवलंब करत, आपला पक्षा वाढवला. मात्र त्याच संघर्षानंतर शिवसेना राष्ट्रवादी, आणि काँगे्रससोबत सत्तेत सहभागी झाला. सत्तेत सहभागी होण्यापूर्वीच शिवसेनेने आपल्या आमदारांची आणि खासदारांची मते विचारात घेण्याची गरज होती. मात्र अनेक राजकीय पक्षात आपल्या कार्यकर्त्यांचे, आमदारांचे-खासदारांचे मते विचारात घेतले जात नाही. त्याचा पुरता अनुभव आज शिवसेना घेत आहे. शिवसेना आतून पुरती हादरली असून, आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सिलसिला सुरु केला आहे. त्याचेच प्रतिबिंब म्हणजे, शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देणे होय. शिवसेनेने यापूर्वी देखील प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी या उमेदवारांना पाठिंबा देत आपले वेगळे स्थान अधोरेखित केले होते. मात्र शिवसेना भाजपविरोधात आघाडी उभारु इच्छिणार्‍या पक्षांसोबत जाण्यास इच्छूक होता. ममता बॅनर्जी यांनी देखील मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तर सोनिया गांधी, राहूल गांधी यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सारखे संवाद सुरु होते. त्यामुळे शिवसेना भाजपविरोधी आघाडीत प्रवेश करेल, असे संकेत मिळत असतांनाच, शिवसेनेने द्रौपद्री मुर्मूंना पाठिंबा व्यक्त करत, या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण दिले. शिवसेनेतील 40 पेक्षा अधिक आमदारांनी वेगळा रस्ता धरला असून, 10-12 खासदारांनी देखील शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा वेळी शिवसेनेतील पडझड रोखण्यासाठी शिवसेना आपल्या खासदारांना अनुकूल असा निर्णय घेतांना दिसून येत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांची पुरती पीछेहाट झाली आहे. शिवसेनेवर एकप्रकारे वर्चस्व निर्माण करू पाहणारे, आणि प्रत्येक निर्णयात आपलेच प्रतिबिंब उमटले पाहिजे, म्हणजेच आपणच शिवसेना चालवत असल्याचा अधून-मधून ज्यांना भास होतो, असे संजय राऊत आता पुरते एकाकी पडले आहेत.
शिंदे गट जेव्हा बाहेर पडला, तेव्हा त्यांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी कोणताही द्वेष नसला, तरी देखील त्यांच्या मनात मात्र संजय राऊविषयी कमालीचा राग होता. कारण आमदारांचे निर्णय डावलण्यात आपल्याला पाहिजे तसे निर्णय घेण्यात संजय राऊत नेहमीच मातोश्रीमध्ये हस्तक्षेप करायचे. वास्तविक पक्षात लोकशाही असायला हवी, त्याचे प्रतिबिंब उमटायला हवे. अन्यथा काँगे्रस पक्ष जसा हायकमांड संस्कृतीमुळे रसातळाला गेला, तसाच शिवसेना देखील त्याच मार्गावर असल्याचे दिसून येते. मात्र अडीच वर्षांपूर्वी आघाडीत सत्तेत जाण्यापेक्षा, शिवसेना विरोधात जरी बसली असती, तरी शिवसेनेचे सर्व आमदार-खासदार एकत्र असते. मात्र आपण सत्ता कोणत्या मार्गाने मिळवतो, त्यापेक्षा कशी मिळवतो, हे महत्वाचे आहे. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणे, राज्यातील जनतेला पसंद पडलेले नव्हते. तरी देखील शिवसेना सत्तेत सहभागी झाली. मात्र असे असतांना देखील शिवसेनेचे आमदार-खासदार सत्तेतून बाहेर पडा, असे सातत्याने सांगत होती. मात्र उद्धव ठाकरेंनी त्याकडे दुर्लक्ष केले.
शिंदेसेना जरी शिवसेनेतून बाहेर पडली असली तरी, शिंदेगटाचे दीपक केसरकर यांनी शिवसेनेसोबत चर्चेचे मार्ग कायमच खुले ठेवले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे जाईल, असे काहीही होण्याची चिन्हे सध्या तरी होण्याची शक्यता कमी आहे. कारण शिंदे गट आणि शिवसेनेचे मनोमिलन होईल, यात शंकाच राहिलेली नाही. कारण त्याशिवाय शिवसेनेसमोर दुसरा पर्याय उपलब्ध नाही, तर दुसरीकडे शिंदे गट देखील शिवसेना सोडणार नाही, हे एव्हाणा स्पष्ट झालेले आहे.

COMMENTS