Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संसदेतील कार्यालय शिवसेनेने घेतले ताब्यात

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिवसेनेला बहाल केल्यानंतर शिवसेना अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये असून, त्यांनी विधिमंडळातील पक्ष

कोपरगाव बाजार समितीत जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू-स्नेहलता कोल्हे.
आदिवासी बांधवांसाठी प्रमाणपत्राची विशेष मोहीम- के.सी. पाडवी
सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली : मुख्यमंत्री ठाकरे

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिवसेनेला बहाल केल्यानंतर शिवसेना अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये असून, त्यांनी विधिमंडळातील पक्षाचे कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर मंंगळवारी शिंदे गटाने शिवसेनेचे संसदेतील कार्यालय ताब्यात घेतले आहे. शिवसेनेच्या सर्व आस्थापना आणि पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतल्यावर आता संसदेतील कार्यालय देखील शिंदे गटाने ताब्यात घेतले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. हा निर्णय येताच शिंदे गटाने शिवसेनेच्या ताब्यातील पक्ष कार्यालय आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात काल विधीमंडळातील शिवसेनेचे पक्ष कार्यालय घेऊन करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी संसदेतील पक्ष कार्यालय देखील शिंदे गटाने ताब्यात घेतले आहे. शिंदेगटाचे नेते राहुल शेवाळे यांना पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर संसदेतील हे कार्यालय शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वापरण्यात येत आहे. वादादरम्यान देखील दोन्ही गट या एकाच पक्ष कार्यालयात बसत होते. पण आता लोकसभा सचिवालयाने शिवसेना शिंदे गटाला हे कार्यालय दिले आहे. काल विधानसभेच्या पक्ष कार्यालयानंतर संसदेतील शिवसेनेचे कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आले आहे.

COMMENTS