ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या शिवसेना उपविभाग प्रमुखाच्या डोक्यात तीक्ष्ण हत्

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या शिवसेना उपविभाग प्रमुखाच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. रवींद्र परदेशी (वय 48, रा. खारकर आळी, ठाणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. तर फेरीवाल्यांच्या वादातून टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
COMMENTS