Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये शिवसेना सभासद नोंदणी अभियान उत्साहात

कोपरगाव शहर ः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. या योजनेतून महिलांना लाभ मिळण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी जास्तीत

आढळराव सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश शिंदे
संविधान दिन लोकशाही बळकटीसाठी प्रेरणा देणारा :सुभाष लिंगायत
निसर्ग व पर्यावरण मंडळाचे कार्य आदर्शवत : डॉ.दुधाट

कोपरगाव शहर ः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे. या योजनेतून महिलांना लाभ मिळण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त फार्म भरून घेतले पाहिजे. शिर्डी लोकसभा मतदार संघात झालेल्या पराभवाला खचून न जाता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहायचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्या आदेशाचे आपण काटेकोर पणे पालन करायचे आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने उभे रहा असे आवाहन शिर्डी लोकसभेचे निरीक्षक राजेंद्र चौधरी यांनी
कोपरगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खा सदाशिवराव लोखंडे यांच्या सुचनेनुसार कोपरगाव तालुका व कोपरगाव शहर शिवसेना सभासद नोंदणी अभियान प्रसंगी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. पोहेगांव नागरी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे विजय काळे होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख भगीरथ होन, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे, मीनाक्षीताई वाकचौरे, आरती गाढे,बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, सर्जेराव कदम, शिवसेना तालुकाप्रमुख संजय गुरसळ, भाऊसाहेब थोरात, जिल्हा संघटक शिवाजी जाधव, अक्षय जाधव, अभिषेक आव्हाड, सरपंच अमोल औताडे, मनोज राठोड, प्रशांत रोहमारे, रवीद्र औताडे, घनश्याम वारकर, कैलास आसणे, जालिंदर कांडेकर, अनिल होन,प्रभाकर होन, दादाभाई सय्यद, अशोक म्हाळसकर, हौसीराम पाडेकर,शरद घारे, दत्तात्रय भालेराव आदीसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे  यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने जे काम केले. त्या कामाची माहिती आपण जनतेसमोर मांडली पाहिजे. शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घटक पक्षातील नेत्यांनी मदत केली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती. यापुढे त्यांच्या भरोशावर न राहता आपण तयारी सुरू केली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता गावागावात मंडप लावून बसलेले लोकसभेच्या निवडणुकीत घरातून बाहेर निघाले नाही. त्यांच्याकडून लोकसभेसाठी देखील अशाच पद्धतीने मंडप लावणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही.शिवसेना सभासद नोंदणी अभियान सुरू झाले आहे. जास्तीत जास्त सभासद नोंदणी होण्यासाठी शिवसैनिकांनी काम करावे असे आवाहन  त्यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब थोरात यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब रहाणे यांनी केले तर आभार भगिरथ होन यांनी मानले.

COMMENTS