Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली नाहीः कीर्तिकर

महायुतीत जागा वाटपावरून ठिणगी

मुंबई ः महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून ठिणगी पडतांना दिसून येत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदार

सिन्नर तालुक्यात शांतिगिरीजी महाराजांचे नागरिकांनी केले उत्फुर्त स्वागत 
कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणी दोन्ही गटातील आठ आरोपींना अटक  
मानवाच्या हातासमोर तंत्रज्ञान फिके

मुंबई ः महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून ठिणगी पडतांना दिसून येत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदार गजानन कीर्तिकर महायुतीचा जागा वाटपाचा प्रस्तावावरून भाजपला चांगलेच सुनावले आहे. भाजपने 12 जागांचा दिलेल्या प्रस्तावांच्या चर्चांवरून ठिणगी पडली असून, आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नसल्याचे कीर्तिकर म्हणाले आहेत. महायुतीत 32-12-4 असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. भाजपाला 32, शिवसेनेच्या शिंदे गटाला 12 आणि अजित पवार गटाला 4 जागा दिल्या जाणार असल्याचा कथित फॉर्म्युला सध्या समाजमाध्यमांवरही व्हायरल होत आहे. यावर आता शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी या कथित फॉर्म्युलाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत भाजपने शिवसेनेपुढे 12 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. त्यावर शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. महायुतीमधील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कुठून आला मला माहिती नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही.  गेल्या निवडणुकीत भाजपा 26 जागांवर लढली होती. त्यांचे तीन उमेदवार पराभूत झाले आणि त्यांनी 23 जागा जिंकल्या. तर आम्हाला 22 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी आमचे चार उमेदवार पडले आणि आम्ही 18 जागा जिंकल्या. तसेच राज्यात विरोधी पक्षांचे सात उमेदवार जिंकले. असेही कीर्तिकर यांनी यावेळी सांगितले. भाजप व शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या कोट्यातील जागा देण्याची चर्चा सुरू आहे. पण आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही. आम्ही अधिकाधिक जागा लढवण्यावर ठाम आहोत, असेही गजानन कीर्तिकर यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.

COMMENTS