अहिल्यानगर : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देणारा निर्णय घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्पष्ट केले की, शेत व शिव पाणंद रस्त्यांचे स
अहिल्यानगर : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देणारा निर्णय घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्पष्ट केले की, शेत व शिव पाणंद रस्त्यांचे सीमांकन, हद्दी निश्चिती, सांकेतिक क्रमांक देणे आणि अतिक्रमणमुक्त रस्ते मजबूत करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक लवेसू-2025/प्र.क्र. 458/भूमापन-1, दि. 29 ऑगस्ट 2025 नुसार तहसील कार्यालयांना शेतरस्त्यांचे सीमांकन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेवा पंधरवड्यानिमित्त सुरू झालेली ही मोहीम आता कायमस्वरूपी व निरंतर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी ग्रामीण, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय शेतरस्ता समित्या लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याचेही डॉ. आशिया यांनी सांगितले. या समित्यांद्वारे सीमांकन, अंमलबजावणी आणि तक्रारींचा निपटारा अधिक वेगाने करण्यात येईल. शेतरस्त्यांशी संबंधित अपील प्रकरणांबाबत जिल्हा न्यायाधीश श्रीमती शेंडे यांच्याशी चर्चा होऊन कलम १४३ व ५२ अंतर्गत प्रकरणांचा जलद निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक गावातील शिवार फेरी घेऊन शेतरस्त्यांचे सीमांकन प्रत्यक्ष पाहणीसह पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी सुगम मार्ग तयार होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पाणंद रस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष शरद पवळे, उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे-पाटील, विनोद गोळे, बापूराव चव्हाण, विठ्ठल निर्मळ यांनी सीमांकन कार्यपद्धतीला मुदतवाढ देण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे देखील बैठक घेण्यात आले यावेळी प्रा. डॉ. लक्ष्मण मतकर, बाळासाहेब थोरात, कानिफनाथ कदम, प्रशांत चौधरी, कैलास दहिफळे, रामदास तनपुरे, प्रकाश देवकाते, बाजीराव जगदाळे, उषा हुके, रावसाहेब पंडित, रमेश भक्त, अनिल सरोदे, गोपीनाथ लोंढे, सिद्धार्थ दहातोंडे, प्रतीक ठोंबरे, साहेबराव आखाडे, जानको रुपनर, बाबासाहेब मकासरे, देविदास शिंदे, कृष्णादास जठार, विठ्ठल करमळ, सुभाष शेळके, भाऊसाहेब वाळूंज, दशरथ वाळूंज, बबन गुंड आदिसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS