Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात तब्बल सात तास चालली शिवजयंती मिरवणूक

 ।संगमनेर : संगमनेर शहरात महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त ढोल ताशाच्या गजर

पेट्रोल, सीएनजी पंपाची डीलरशीप देतो म्हणून 61 लाखांची फसवणूक
शिवरायांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका
प्रा.डॉ.संजय गवई यांची तज्ञ व्याख्याते म्हणून निवड
image0.jpeg

 ।संगमनेर : संगमनेर शहरात महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या दणदणाटात छत्रपती शिवाजी महाराज की… जय जय भवानी ….जय शिवाजी असा जयघोष करत भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. तब्बल सात तास चाललेल्या या मिरवणुकीत सादर करण्यात आलेली अघोरी व आदिवासी नृत्याने संगमनेरकर भारावून गेले.

संगमनेर नगरपालिकेच्या प्रवेशद्वारा पासून या मिरवणुकीला आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व महायुतीच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली . मिरवणुकी च्या अग्रभागी ढोलीबाजा सनईचौघडे त्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराजयांची पालखी, बाल वारकऱ्यांचे भजन, निरगुडे जाधव वाडी येथील ढोलताशा पथक, शिवकालीन मर्दानी खेळ लाठी काठी हरियाणावरून बोलविलेले अघोरी नृत्य, आदिवासी महिला व पुरुष आदिवासी नृत्य कल्याण बदलापूरचे आकर्षण बँजोपथक आणि वक्रकुंड डी जे आदींचे आकर्षण या मिरवणुकीत होते. तरुण मित्रमंडळ हातामध्ये भगवे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभागी झाली होती. ही मिरवणूक लालबहादूर शास्त्री चौक बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यदबाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक, छत्रपती शिवाजी स्मारकाच्या मार्गे संगमनेर बस स्थानकावर या मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी संपूर्ण संगमनेर शहर भगवेमय केले होते

 छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे तसेच बस स्थानकावर आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. या मिरवणुकी मध्ये शिवप्रेमी, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS