Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवअमृत महाविद्यालयाची बारावीच्या उज्जवल निकालाची परंपरा कायम

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्ड अंतर्गत असलेल्या एच.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी 2024 चा निकाल बोर्डाच्या

काढलेले पेव्हिंग ब्लॉक पुन्हा बसवा ः सरफराज पठाण
Sangamner : हजरत ख्वाजा पिरमोहंमद सादीक यांचा उरूस साध्या पद्धतीने साजरा
Sangamner : रुग्णवाहिका चालकांनी रुग्णांची लूट केल्यास परवाना रद्द करणार (Video)

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्ड अंतर्गत असलेल्या एच.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी 2024 चा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध झाला आहे. त्या अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेली शिव अमृत कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान )उक्कडगाव.या महाविद्यालयाचे निकालाची परंपरा कायम राहिली असून प्रथम क्रमांक डरांगे स्वर्ण तुकाराम (89.67 टक्के) याने मिळवला. तर द्वितीय क्रमांक शिंदे निनाद भगवान( 82.83 टक्के). तृतीय क्रमांक भुतडा नेल कैलास( 82.33 टक्के)हे महाविद्यालयाचे तीन मानकरी ठरले असून एकूण महाविद्यालयाचा निकाल 98.80 टक्के लागला आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी लावरे यांनी अभिनंदन केले व सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य  भुजाडे एस.बी. व विभाग प्रमुख  टुपके आर एम.व सहकारी प्राध्यापक  गव्हाळे एम. एस. व थोट आर.ए, भगुरे पी. डी., तुपे संदीप , प्रसाद लावरे, पिंपळे सर यांनी वर्षभर विद्यार्थ्यांसाठी मोठे परिश्रम घेतले व आपल्या महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम ठेवून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस सर्वांनी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

COMMENTS