Homeताज्या बातम्यासंपादकीय

सत्तासंघर्षात शिंदे गटाची गोची

शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटाने 41 आमदारांसह भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. यावेळी शिंदे गटाने महाविकास आघाडीसोबत होणारी कोंडी, अजित पवा

पहाटेच्या शपथविधीचे अर्धसत्य
न्यायालयीन सक्रियता
आयुष्याची दोर बळकट करायची की पंतगांची ?

शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटाने 41 आमदारांसह भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. यावेळी शिंदे गटाने महाविकास आघाडीसोबत होणारी कोंडी, अजित पवारांनी आमच्या आमदारांना निधी देतांना नेहमी दुय्यम वागूणक दिली, राष्ट्रवादी काँगे्रसच्या आमदारांना मात्र मोठी आर्थिक रसद पुरवण्यात येत होती, असा दावा करत, शिंदे गट सत्तेबाहेर पडत, भाजपसोबत नव्याने सत्ता स्थापन केली. बाहेर पडल्यामुळे शिंदे गटाला लॉटरी लागली असून, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यानंतर शिंदे गटाने थेट शिवसेना पक्ष अणि पक्षचिन्हावर दावा केला. त्यातच निवडणूक आयोगाने निकाल देत शिवसेना शिंदे गटाची असल्याची जाहीर केला. त्यामुळे शिंदे गटाला सगळ्या बाबी अनुकूल झाल्याचे दिसून येत होत्या, मात्र राजकारण हे एवढे सोपे नाही. राजकारणात संघर्ष करावा लागतो, तावून सुलाखून निघावे लागते, तरच आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रकाश पडतो. मात्र शिंदे गटाचा हा आनंद केवळ एकवर्षच टिकला. कारण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह बहुसंख्य आमदाराने भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिले आहे. त्यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. यामुळे आता शिंदे गटाची मोठी गोची होतांना दिसून येत आहे. त्याचबरोबर आता शिंदे गटावर मोठी टांगती तलवार उभी राहतांना दिसून येत आहे. कारण 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घ्यावा लागणार आहे. त्यामुळे जर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र झाले तर, शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, हे आता लपून राहिलेले नाही. एकनाथ शिंदे यांचा बळी भाजप देणार आहे, त्याचे प्रमुख कारण म्हणजे भाजप हा पक्ष नेहमी निवडणुकांच्या तयारीत असणारा पक्ष आहे. मात्र आगामी निवडणुका जर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या तर, भाजप आणि शिंदे गटाच्या जागा मोठ्या प्रमाणात घटण्याचा एका सर्व्हेत समोर आला आहे. त्यामुळे कर्नाटकानंतर भाजप महाराष्ट्र आपल्या हातून जातांना दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा आपल्या हातात ठेवण्यासाठी भाजपला एखादा मित्रपक्ष किंवा एखाद्या पक्षातील लोकनेता हवा होता, जो आपल्यासोबत 25-30 आमदारांना सोबत घेवून येईल. त्याचबरोबर अजित पवार राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये होणारी घुसमट, भाजपसोबत जाण्याची भूमिका, आणि त्याला शरद पवारांचा असणारा विरोध यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा एकेदिवशी स्फोट होणारच होता. आणि तो स्फेाट झाला असून, अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे मात्र शिंदे गटाची पुरती गोची झाली आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिमंडळात वाटा भेटेल यासाठी गुडघ्याला बांशिंग बांधून तयार होते. मात्र अजितदादा मंत्रिमंडळात सहभागी झाल्यामुळे साहजिकच शिंदे गटाला आता मंत्रिमंडळात संधी कमी प्रमाणात भेटेल यात शंकाच नाही. कारण यापूर्वी 20 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यानंतर अजित पवारांसह 9 आमदारांनी शपथ घेतली आहे, त्यामुळे 13-14 आमदारच केवळ मंत्रिपदाची शपथ घेवू शकतात, अशावेळी भाजप आपल्या काही आमदारांना आगामी मंत्रिमंडळात स्थान देईन, त्यामुळे आगामी काही दिवसांत जर मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा झाला तर, शिंदे गटाच्या केवळ 4-5 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खळबळ माजली आहे. शिंदे गटातील काही आमदार पुन्हा एकदा ठाकरे गटात परतण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे आगामी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास शिंदे गटात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता असल्यामुळे हा विस्तार लांबणीवर टाकला जात आहे. 

COMMENTS