शिंदे सरकारची उद्या परीक्षा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे सरकारची उद्या परीक्षा

बहुमत चाचणीसाठी दोन दिवशीय विशेष अधिवेशन ; विधानसभा अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरु

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्षांचा अंक संपुष्टात आला असून, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर शुक्रवारी

शिक्षकांच्या बदलीसाठी होणार सोमवारपासून प्रोफाईल अपडेट
युगप्रवर्तकांस …
तुमचा फौजदाराचा हवालदार केला आमची मापे कशाला काढता?

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्षांचा अंक संपुष्टात आला असून, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर शुक्रवारी बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार होतेे. मात्र हे अधिवेशन पुढे ढकलले असून, आता हे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, 3 जुलै आणि 4 जुलै, रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, 3 जुलै रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे. तर याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक देखील होणार असून, यासाठी शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

विधानसभा अध्यक्षासाठी राहुल नार्वेकर यांना संधी
आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यांक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावार शिक्कामोर्तब झालेय. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहाता राहुल नार्वेकर पुढील विधानसभा अध्यक्ष होणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेय. राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचेच खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करत आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे..

बहुमत चाचणी पुढे ढकलण्यास सर्वोच्च नकार
बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्यानंतर बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पक्षाने निलंबन केलेल्या आमदारांना बहुमत चाचणीची परवानगी देऊ नका तसेच यावर तातडीने सुनावणी करण्याची याचिका शिवसेनेकडून दाखल करण्यात आली होती. मात्र, सुप्रीट कोर्ट हे आपल्या निर्णयावर ठाम असून तातडीची सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या निलंबण प्रकरणी सुनावणी ही आता 11 जुलै रोजीच होणार आहे. शिवाय बहुमत चाचणी देखील ठरलेल्या वेळीच होणार आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने पक्षातील 16 आमदारांनी पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने त्यांना नोटीस बजावली होती.

COMMENTS