Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे शिवसेनेच्या आमदारांमध्ये फ्री स्टाईल

विधानभवनाच्या लॉबीमध्येच दादा भुसे-महेंद्र थोरवे भिडले

मुंबई ः विधानभवनाच्या लॉबीमध्ये शुक्रवारी शिंदे शिवसेनेच्या गटाच्या आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. आमदार

नाईट हायस्कुल नाशिक शालेय् समितीच्या वतीने शुभ दिपावली स्नेह मेळावा
मराठा वधू-वर मेळाव्याचे आयोजन
भाजपकडून सुडाचं राजकारण : मुख्यमंत्री ठाकरे | DAINIK LOKMNTHAN

मुंबई ः विधानभवनाच्या लॉबीमध्ये शुक्रवारी शिंदे शिवसेनेच्या गटाच्या आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. आमदार दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या वादाची कुणकुण भरत गोगावले आणि शंभुराज देसाई यांना लागलत्याने त्यांनी तातडीने मध्यस्थी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले. हा वाद नेमका कशामुळे झाला ही समजू शकले नाही. दरम्यान, थोरवे यांनी मतदार संघातील कामावरून भुसे यांना जाब विचारल्याने ही वादावादी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, या घटनेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. विधान सभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. या साठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आम विधीमंडळात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आले होते. ते सभागृहात असतांना महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे हे लॉबीमध्ये होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या मतदार संघातील कामाची विचारणा दादा भुसे यांना केली. या कारणामुळे दादा भुसे यांना राग आला. यावरून दोघांमध्ये आधी वाद झाला. हा वाद नंतर बाचाबाचीत झाला. यातून दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. दोघांचे वाढलेले आवज ऐकून त्या ठिकाणी असलेले शंभुराजे देसाई व भरत गोगावले हे त्यांच्या जवळ आले. त्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. दरम्यान, या घटनेमुळे पक्षातील अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे. सुसंस्कृत आमदारांमध्ये या प्रकारचे वाद होणे योग्य नाही अशी टीका विरोधकांनी केली. सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार सध्या वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. आमदारांनी पोलीस ठाण्यातच केलेला गोळीबार असो किंवा इतर वादाचे प्रकार यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री आणि आमदार यांच्यात झालेला वाद यामुळे विरोधक सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका करत आहेत.

COMMENTS