Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पढेगावच्या शिंदे दाम्पत्याचे तीन तासाच्या अंतराने निधन

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील पढेगाव येथील वारकरी सांप्रदयाच्या शेतकरी कुटुंबातील भागीरथीबाई भगीरथ शिंदे वय 70 यांचे मंगळवारी सकाळी सव्वादहाच्य

हनुमंत पाटीलबा गायकवाड यांचे निधन
हरितक्रांतीचे जनक थोर शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचं ९८ व्या वर्षी निधन
3 इडियट्स सिनेमातील ‘लायब्रेरियन दुबे’ अखिल मिश्रा यांचं निधन

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील पढेगाव येथील वारकरी सांप्रदयाच्या शेतकरी कुटुंबातील भागीरथीबाई भगीरथ शिंदे वय 70 यांचे मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. अंत्यविधीची तयारी चालु असताना त्यांचे पती ह.भ.प.भगीरथ दगडू शिंदे (वय 73) यांचेही हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी एक वाजता निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर एकाचवेळी दूहेरी संकट कोसळले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पढेगाव वैकुंठभूमीत या दांपत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे एक मुलगी दोन मुले  संतोष आणि परमेश्‍वर असा परिवार आहे.

COMMENTS