Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्काम ठोकून आंदोलनात शेवगाव बार असोसिएशन होणार सहभागी

शेवगाव तालुका ः  शेवगाव शहर नागरिक कृती समितीच्या सौ हर्षदा काकडे यांनी शेवगाव शहराच्या गंभीर बनलेल्या पाणी प्रश्‍नासाठी 30 रोजी शेवगाव नगर परिषद

वृक्ष वेद फाउंडेशन व वृक्षमित्र संघटनेच्या वतीने वृक्षारोपण
तलाठ्याच्या वाहनाल ट्रँक्टरची धडक
पुणतांबा ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढत

शेवगाव तालुका ः  शेवगाव शहर नागरिक कृती समितीच्या सौ हर्षदा काकडे यांनी शेवगाव शहराच्या गंभीर बनलेल्या पाणी प्रश्‍नासाठी 30 रोजी शेवगाव नगर परिषद परिसरात सहकुटुंब भोजन व्यवस्थेसह ‘मुक्काम ठोकून आंदोलन’ हाती घेतले. त्या आंदोलनात शेवगाव तालुका बार असोसिएशनचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत अशा आशयाचा ठराव बार असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन शेवगाव वकील संघाचे सदस्य अ‍ॅड.कारभारी गलांडे यांनी शेवगाव येथे केले. सोमवारी 27 रोजी शेवगाव बार असोसिएशनच्या सदस्यांची शेवगाव येथे बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ सदस्य अ‍ॅड.अर्जुनराव जाधव, बार असोसिएशनचे अध्यक्ष ड.आर.जी.बुधवंत, उपाध्यक्ष अ‍ॅड.व्ही.ए.भेरे, सचिव अ‍ॅड.एस. आर. देशमुख, अ‍ॅड.अशोक गांधी, अ‍ॅड. लक्ष्मण लांडे, अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड. थोरात भाऊसाहेब, अ‍ॅड. वेलदे भाऊसाहेब, अ‍ॅड.बाळासाहेब शिंदे, अ‍ॅड.कराड भाऊसाहेब, अ‍ॅड. भागचंद उकिर्डे, अ‍ॅड. गाडेकर भाऊसाहेब, अ‍ॅड. प्रसाद फलके आदी प्रमुख उपस्थितीत होते. पुढे बोलताना अ‍ॅड. गलांडे म्हणाले की, शहरातील पाणी प्रश्‍न अतिशय गंभीर बनलेला आहे. पंधरा ते वीस दिवसातून एकदा शहरात पाणी पुरवठा होतो. त्यात पहिले पाच मिनिटं नळाला हवाच येते, नंतर दोन-तीन मिनिटे गढूळ पाणी आणि नंतर येणारे पाणी पण खराबच असते. तसेच पाणी येण्याअगोदर कोणतीही पूर्व सूचना नागरिकांना देण्यात येत नाही. परिणामी नागरिकांना काम सोडून पाण्याची वाट पहावी लागते तर काहींना बाहेरून विकत टँकरने पाणी घ्यावे लागते. ज्यांची परिस्थिती पाणी विकत घेण्याइतपत सक्षम नाही मग अशा नागरिकांनी काय करायचे ? पालिका प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेले आहे. सौ.काकडे यांनी विषय हातात घेऊन अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे आम्ही बार असोसिएशनचे सदस्य आंदोलनामध्ये पूर्णपणे सहभागी होणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी काकडे म्हणाल्या की, शेवगाव बार असोसिएशनच्या पाठिंब्याने आपल्या आंदोलनाला हत्तीचे बळ मिळाले आहे. नवीन पाणीपुरवठा योजना काम जर वेळेत सुरू झाले असते तर आज नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नसती. पाथर्डी पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले व निम्मे काम पूर्णही झाले आहे. नवीन योजनेसाठी निधी मंजूर असून कार्यारंभ आदेशही देण्यात आलेला आहे. याला वर्ष होऊनही काम सुरु होत नसल्याने यामध्ये निश्‍चितच काहीतरी गौड बंगाल आहे व ते शोधण्याचे काम आता आपल्या सर्वांवर आहे. त्यासाठी 30 मे रोजीच्या आंदोलनाला सर्व वकील बंधूंनी पाठींबा देण्याचे ठरवले व तसे लेखी पत्रही कृती समितीला दिले आहे. त्याबद्दल काकडे यांनी यावेळी बार सदस्यांना  कृती समितीच्या वतीने धन्यवाद दिले. या कार्यक्रमाचे आभार अ‍ॅड. थोरात यांनी मानले.

COMMENTS