Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शीतल वाली यांनी स्वीकारला वरिष्ठ वित्त विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार

सोलापूर ःमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वरिष्ठ वित्त विभागीय व्यवस्थापक म्हणून शीतल महादेव वाली यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला आहे.  ते केंद्

सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू
जागृती शुगरच्या संचालकपदी बालाजी बिराजदार यांची निवड
उदगीरात महाविकास आघाडीचा सत्याग्रह

सोलापूर ःमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वरिष्ठ वित्त विभागीय व्यवस्थापक म्हणून शीतल महादेव वाली यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला आहे.  ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2016 च्या परीक्षा बॅचचे इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस (आयआरएएस) अधिकारी आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या वरिष्ठ वित्त विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात उप वित्त सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. श्री शीतल वाली यांनी सोलापूर विभागाचे मावळते वरिष्ठ  वित्त  विभागीय व्यवस्थापक विवेक होके यांचा ते प्रशासकीय पदभार स्वीकारला आहे.

शीतल वाली यांना आयुष्यात बारावी सारख्या महत्त्वाच्या वळणावर अपयशाची ठेच लागली. नैराश्याने ग्रासलेल्या मनाने काहीकाळ खच खाल्ली. पण आई वडील आणि भाऊ यांनी पुन्हा नव्याने प्रयत्न कर, या शब्दातून दिलेला आधार त्याला उभारी घेण्याचे बळ ठरला. बारावी पास होत लॉ ची डिग्री मिळवली. अभ्यासाचे तंत्र आणि गोडी यांची नस सापडली आणि काही वर्षापूर्वी अपयशाने कोमेजलेल्या डोळ्यांत यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेचे शिखर गाठण्याचे स्वप्न आकाराला आलं. एक अपयशाची ठेच ते केंद्रीय प्रशासकीय सेवेच्या परिघात घेतलेली झेप हा प्रवास शीतल वाली या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलाचं आयुष्य घडवणारा ठरला. समाजाकडे पाहण्याची दृष्टी आणि समाजासाठी काम करण्याची जाणीव मला या परीक्षेच्या निमित्ताने झाली, नापास झालेल्या मुलांचे खच्चीकरण करून त्यांच्या शिकण्याच्या प्रवासाला खीळ घालू नका. असे सांगत शीतल वाली, समाजातील अति महत्त्वाकांक्षी पालकांनाही चिमटा काढला. ‘ठेच लागली तरी झेप घ्या’, या एका वाक्यात शीतल वाली  खूप काही सांगितले. शीतल वाली यांनी एलएलबी पदवीचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आणि सायबर लॉचे  पदव्युत्तर  शिक्षण हे  नालसर कायदा विद्यापीठ हैदराबाद, तेलंगणातून पूर्ण केले. शीतल वाली यांना 2022 यावर्षी  मध्य रेल्वेच्या मुख्य आर्थिक सल्लागार पुरस्काराने सम्मानित केले.शीतल वाली यांनी आपली सात वर्ष अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. येणार्‍या काळात याच दीर्घ अनुभवाचा सोलापूर विभागाला नक्कीच फायदा होईल.

COMMENTS