Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

निवडणूक आयोगच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

मुंबई ः केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला 6 फेबु्रवारीला दिल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला होत

वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल
ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर
घराणे शाही चालू देणार नाही – प्रकाश आंबेडकर 

मुंबई ः केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला 6 फेबु्रवारीला दिल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला होता. त्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार गटाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजप – शिवसेना युतीमध्ये सत्तेत सहभाग घेतला. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील दावा सांगितला होता. त्या संदर्भात निवडणूक आयोगामध्ये झालेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने अजित पवार या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह देखील दिले होते. या विरोधात शरद पवार गटाने ही याचिका दाखल केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वास्तविक अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला सांगितले होते. 6 महिने चाललेल्या 10 सुनावणीनंतर घड्याळ हे निवडणूक चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित गटाला देण्यात आले आहे. यानंतर आयोगाने शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिले होते. या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

आमदार अपात्रता निर्णय प्रलंबित – सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँगे्रसच्या आमदार पात्र-अपात्रतेचा फैसला घेण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 15 फेबु्रवारीपर्यंत मुदत दिली होती. अखेर या मुदतीला काही तासांचा अवधी उरलेला आहे. या संदर्भातील सुनावणी आपण पूर्ण केली असून लवकरच निकाल जाहीर करणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. मात्र याआधी शिवसेना पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर आलेला निकाल पाहता विधानसभा अध्यक्ष देखील अजित पवार गटाच्या बाजूने निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

COMMENTS