Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या तालुकध्यक्षपदी शरद खरात

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनची कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात सर्वानूमते कोपरगाव तालुका अध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीचे शरद

आ. थोरातांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची घेतली भेट
महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी
कोपरगाव तालुक्यात 44 हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनची कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात सर्वानूमते कोपरगाव तालुका अध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीचे शरद खरात यांची एकमताने निवड करण्यात आली. कोपरगाव ग्रामीण अध्यक्षपदी बाळासाहेब घेर, तालुका उपाध्यक्षपदी ऋषिकेश आढाव, दिपक पगारे ग्रामीण उपाध्यक्षपदी कौस्तुभ वाघ, कार्याध्यक्षपदी प्रमोद सोनवणे,सचिव पदी अभय हलवाई, सह सचिव पदी आतिश बोरुडे तर सदस्यपदी चंद्रकांत जगदाळे, रवींद्र साळुंके, सागर भडे यांची एकमताने निवड करत कमिटी तयार करून ठराव मंजूर करण्यात आला. निवड झलेल्या पदाधिकारी यांचा कमिटीच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच कोपरगाव या ठिकाणी लवकरच कोपरगाव तालुका उत्तर महाराष्ट्र मास्टर श्री व उत्तर महाराष्ट्र क्लासिक श्री, या शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच लवकरच स्पर्धेची तारीख व ठिकाण जाहीर करण्यात येईल असे नवनियुक्त कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. सर्वही बैठक यशस्वी करण्यासाठी अमीन सय्यद, प्रतीक पाटील (नगर जिल्हा खजिनदार व महाराष्ट्र लेव्हल जज), विद्युत जोशी, विजय घोरपडे यांनी अथक विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS