Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शनिशिंगणापुरात शनि लीलामृत पाच दिवसीय ग्रंथ पारायण

सोनई ः श्री. शनिजयंतनिमित्त शनी शिंगणापूर मंदिर परिसरात पाच दिवसीय शनी लीलामृत ग्रंथ पारायण सोहळा 3 जून ते 7 जून पर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती

स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी – नगरसेवक डॉ.सागर बोरुडे
समृद्धीच्या दुसर्‍या टप्प्याचे लोकार्पण
नगरच्या विकासासाठी कुणाशीही आघाडी करायला आम्ही तयार-खासदार सुजय विखे | आपलं नगर | LokNews24 |

सोनई ः श्री. शनिजयंतनिमित्त शनी शिंगणापूर मंदिर परिसरात पाच दिवसीय शनी लीलामृत ग्रंथ पारायण सोहळा 3 जून ते 7 जून पर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.
सोमवार 3 जून ते 5 जून रोजी सकाळी 8 ते 11 ग्रंथ पारायण, 6 जून रोजी दुपारी 12 वाजता. शनि जन्म उत्सव सोहळा, तसेच 7 जून रोजी बीड येथील हभप. समाधान महाराज शर्मा यांचे सकाळी 10 वाजता कीर्तन व दुपारी 12.30 वाजता देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुराव लक्षमन बानकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जाहीर झालेले हरियाणा राज्यातील श्री.1008 परमहंस गुरुदेव कृष्णा नंद कालिदास बाबाजी यांना शानिरत्न पुरस्कार श्री.क्षेत्र देवगड संस्थांचे हभप. गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी प्रमुखउपस्थिती बीडचे हभप. समाधान महाराज शर्मा,हभप.महंत उद्धवजी महारा मंडलिक, हभप. महंत. सुनील गीरिजी महाराज, व आमदार शंकरराव गडाख यांची उपस्थित राहणार आहे. तरी भाविकांनी या धार्मिक सोहळाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर व विश्‍वस्त मंडळाने यांनी केले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

COMMENTS