Homeताज्या बातम्यामनोरंजन

शाहरुख खानचा जवानाची 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणजेच अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये २० व्या दिवशी देखील कायम आहे. हा चित्

बॉलिवूडमधील मराठमोळ्या ‘इक्बाल’ची बिग बॉसच्या घरात एन्ट्री ?
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा झटका… नेत्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात
Sangamner : थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये २० व्या दिवशी देखील कायम आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करत बक्कळ कमाई करतच सुटला आहे. ‘ओपनिंग डे’ला बक्कळ कमाई करत हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला.

जवानने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड मोडला. भारतीय बॉक्स ऑफिसवर जवानने पहिल्या आठवड्यातच ३९० कोटींची कमाई केली होती. महत्वाचे म्हणजे जवान चित्रपटाने जगभरामध्ये १००० कोटींपार कमाई केली आहे. ‘जवान’ प्रदर्शित होऊन ३ आठवडे झाले आहेत. ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शनिवारी १२ कोटी २५ लाखांची कमाई केली होती. रविवारी १४ कोटी ९५ लाखांची कमाई केली. तर सोमवारी या चित्रपटाने ५ कोटी ३० लाखांची कमाई केली. आता हा चित्रपट आज म्हणजेच मंगळवारी ७ कोटींच्या आसपास कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटाच्या कमाईचा ग्राफ जरी पडला असला तरी देखील जवान आतापर्यंत चांगली कमाई करत असल्याचे दिसत आहे

‘जवान’ चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये ३९० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने १३६ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये चित्रपटाला ४० कोटींपेक्षा जास्त कमाई करण्यात यश आले आहे. अजून देखील चाहत्यांमध्ये जवानची क्रेझ कायम पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहामध्ये शाहरुख खानचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

COMMENTS