Homeताज्या बातम्यामनोरंजन

शाहरुख खानला मिळाली Y+ सुरक्षा

मुंबई प्रतिनिधी - अभिनेता शाहरुख खान याला सतत धमक्या येत असल्यामुळे सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सतत येत असणाऱ्या धमक्या लक्षात घेत अभिनेत्याल

अजित पवारांच्या बंडाला पूर्णविराम
गुगलचे पुणे ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी
MPSC परीक्षेत अपयश आल्याने तरुणाची आत्महत्या | LOK News 24

मुंबई प्रतिनिधी – अभिनेता शाहरुख खान याला सतत धमक्या येत असल्यामुळे सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सतत येत असणाऱ्या धमक्या लक्षात घेत अभिनेत्याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. राज्य सरकारकडून किंग खान याला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केल्यामुळे शाहरुख खान याला धमक्या मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून तैनात असलेले 6 पोलीस कमांडो शाहरुख खान याच्या सुरक्षेसाठी कायम असतील.

किंग खान याला भारतभर सुरक्षा पुरवली जाईल. एवढंच नाही तर, MP-5 मशीन गन, AK-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तुलने अभिनेत्याची सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे. तसंच अभिनेत्याच्या राहत्या घरी देखील चार पोलीस तैनात असतील. अशी देखील माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सुरक्षेचा खर्च खुद्द शाहरुख खान करणार आहे. शाहरुख खान याच्या दोन सिनेमांना मिळालेलं यश लक्षात घेता अभिनेत्याच्या जीवाला धोका असल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान आणि अभिनेत्याच्या सुरक्षेची चर्चा रंगली आहे. अभिनेत्याला मिळत असलेल्या धमक्यांमुळे चाहते देखील चिंतेत आहेत आयजीपी, व्हीआयपी सुरक्षा दिलीप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान याच्या जीवाला धोका आहे. त्याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेत अभिनेत्याला एस्कॉर्ट स्केलसह Y+ सुरक्षा प्रदान करावी अशी सर्व युनिट कमांडर्सना विनंती करण्यात आली आहे

COMMENTS