Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन पत्नीशी शरीरसंबंध बलात्कारच

नागपूर : अल्पवयीन 18 वर्षांपक्षा कमी वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध हा बलात्कार समजल्या जाईल, त्या व्यक्तीवर व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हाही नोंदवल

नाश्त्यात मीठ कमी असल्याने पत्नीची निर्घृण हत्या l
वारेंचा हट्टीपणा, मोरेंची माघार
ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स : राहुल गांधी यांचा सवाल

नागपूर : अल्पवयीन 18 वर्षांपक्षा कमी वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध हा बलात्कार समजल्या जाईल, त्या व्यक्तीवर व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हाही नोंदवला जाऊ शकतो असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. यासोबतच अल्पवयीन पत्नीवर बलात्कार करणार्‍या आरोपीची 10 वर्षांची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली. अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीने शारीरिक संबंध ठेवणे कायद्यानुसार बलात्कार मानले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. यासंदर्भात निकाल देतांना कोर्टाने म्हटले की, पत्नीशी सहमतीने शरीरसंबंध ठेवायचे असतील तर तिचे वय 18 किंवा त्याहून जास्त वय असले पाहिजे. मात्र 18 हून कमी वयाच्या मुलीशी सहमतीने शरीरसंबंध ठेवले तरीही तो बलात्कारच आहे. ती मुलगी लग्न झालेली असो किंवा लग्न न झालेली. तिच्याशी सहमतीने शरीर संबंध ठेवले तरीही तो बलात्कार आहे असे न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी म्हटले आहे.

COMMENTS