Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालखी मार्गावर मोबाईल टॉयलेट उभारा

निवृत्तीनाथ महाराज संस्थानची माहिती

नाशिक प्रतिनिधी -  संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी नियोजित असणारी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक मंगळवारी (दि. २३) पा

‘हा गडी दुपारीच चंद्रावर गेलाय.. ह्याला काय हाय का नाही : अजित पवार
किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट
‘बाईपण भारी देवा’ पाहून क्रिकेटच्या देव देखील भारावला

नाशिक प्रतिनिधी –  संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी नियोजित असणारी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक मंगळवारी (दि. २३) पार पडली। यावेळी निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यातील सोयीसुविधांबाबत चर्चा केली. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याप्रमाणे महाराज पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र ५०० मोबाईल टॉयलेटचा प्रस्ताव निवृत्तीनाथ संस्थानने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे।  हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्ताव निधी मंजूर झाल्यानंतर मोबाईल टॉयलेट उपलब्ध केले जाणार आहेत।

पालखी सोहळ्यात दोन सणवाहिका, महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र आरोग्य पथके असतील.

चांदीच्या रथासोबत २० बंदूकधारी पोलीस राहणार आहेत. निवृत्तीनाथांचा सप्तशतकोत्तरी जन्मवर्ष महोत्सव सुरू असल्याने नाशिक शहरामध्ये पालखीचे स्वागत करणारी स्वतंत्र कमान उभारणार. पालखी प्रस्थानपासून उत्तर पालखी परत त्रंबकेश्वरला येईपर्यंत सुविधांमध्ये कमतरता राहणार नसल्याची काळजी प्रशासनाने घेतली असल्याचे संस्थानने सांगितले. बैठकीसाठी निवृत्तीनाथ संस्थांचे अध्यक्ष अध्यक्ष निलेश गाढवे, पालखी प्रमुख हभप नारायण मुठाळ, सचिव अॅड.. सोमनाथ घोटेकर, निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त प्रा. अमर ठोंबरे, कांचन जगताप आदी उपस्थित होते।

COMMENTS