Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कपीलधार देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर गंभीर आरोप; देणगी निधी अपहार,बालविवाहास परवानगी,जैसे थे आदेशाचा भंग, या विषयाची चौकशी करून कारवाई करा-संदीपान चव्हाण,रमेश घुमके

बीड : बीड येथील श्रीक्षेत्र कपीलधार येथील श्री मन्मथ स्वामी देवस्थान (संस्था नोंदणी क्र. ए-986, बीड) येथील काही विश्वस्तांवर बेकायदेशीर बांधकाम,

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे; गेवराईतील आश्रम शाळेत ‘आनंद नगरी’ उत्साहात
आजबे महाराजांचे नातू संस्कार खिलारे याला राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदक
किनवट रेल्वे स्थानकावरील असुविधांबाबत भाजप युवा मोर्चा आक्रमक; प्रशासनाला निवेदन

बीड : बीड येथील श्रीक्षेत्र कपीलधार येथील श्री मन्मथ स्वामी देवस्थान (संस्था नोंदणी क्र. ए-986, बीड) येथील काही विश्वस्तांवर बेकायदेशीर बांधकाम, ट्रस्ट निधीचा गैरवापर, दानपेटीतील रकमेचा अपहार तसेच देवस्थान परिसरात बालविवाहास परवानगी दिल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित विश्वस्तांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत संदीपान नारायण चव्हाण व रमेश महारुद्र घुबडे यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, देवस्थान ट्रस्टमधील काही विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रथम अपील क्र. 1520/2013 मधील जैसे थे स्थिती कायम ठेवण्याच्या आदेशाचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, देवस्थानातील दानपेट्या अनेक वेळा विनापरवानगी उघडून त्यातील रकमेचा अपहार करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच न्यायालयीन आदेश असतानाही देवस्थान परिसरात विनापरवानगी बांधकामे करण्यात आली असून ट्रस्ट निधीतून कलर काम, पाणीपुरवठा दुरुस्ती व इतर कामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला, मात्र प्रत्यक्षात ती कामे झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय ट्रस्टच्या हिशोबपत्रकांमध्येही अनेक अनियमितता असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हिशोबपत्रके तयार करून धर्मादाय कार्यालयात सादर करण्यात आल्याचा तसेच विश्वस्त मंडळातील बदल नियमबाह्य पद्धतीने दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, ट्रस्टच्या शेतजमिनीवर शासनाकडून अनुदान घेण्यात आले असले तरी त्या जमिनीचे वार्षिक उत्पन्न हिशोबात दाखविण्यात आलेले नाही. तसेच काही विश्वस्तांनी ट्रस्टच्या जमिनी स्वतःच्या नावावर भोगवटदार वर्ग-1 मध्ये नोंद करून घेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यासोबतच देवस्थान परिसरात मागील अनेक वर्षांपासून बालविवाहास परवानगी दिली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 0047, दि. 05 फेब्रुवारी 2026 रोजी इछड कलम 173 अन्वये गुन्हा नोंद झाल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. दरम्यान, कपीलधार येथील मन्मथस्वामी देवस्थानातील दानपेट्या कार्यालयीन निरीक्षकांच्या देखरेखीखालीच सीलबंद करून उघडण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक भाविक व नागरिकांनी धर्मादाय विभागाकडे अर्जाद्वारे केली आहे. देवस्थानातील निधीच्या पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या अर्जावर सोमिनाथ रसाळ, महेश कोकाटे, अरुण रसाळ, महेश रसाळ, प्रदीप मोरे, प्रदीप कदम, सुशील रसाळ, शिवप्रसाद रसाळ, पंडित रसाळ, सुनील शिंदे, अशोक रसाळ, गजानन चौधरी, पंडित अरबने, बाळासाहेब रसाळ, अनिल राऊत, नामदेव घोडके, केशव घोडके, विनोद वाघेरे, राहुल वाघिरे, उद्धव खल्लाळ, रावसाहेब सपकाळ यांच्यासह पंचक्रोशीतील 21 भाविकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. देवस्थानातील कथित गैरव्यवहाराच्या या प्रकरणात धर्मादाय विभाग व प्रशासन काय निर्णय घेते, याकडे भाविक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS