Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव बस आगारात वरीष्ठांच्या खुर्च्या रिकाम्या

प्रवाशांनी तक्रार करावी कुणाकडे?

कोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव बस स्थानकात साधारणपणे ४५०बसेस असुन,४२८ कर्मचारी कार्यरत आहे.या स्थानकावरुन दैनंदिन १५ ते १७ हजार प्रवासी व शालेय विद्य

राहुरी तालुक्यातील वकिल दाम्पत्यांचे अपहरण करून खून
काकडे कुटुंबियांकडून यशस्वी उद्योजकांचा सन्मान
कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाने टाकला नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर बहिष्कार

कोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव बस स्थानकात साधारणपणे ४५०बसेस असुन,४२८ कर्मचारी कार्यरत आहे.या स्थानकावरुन दैनंदिन १५ ते १७ हजार प्रवासी व शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी प्रवास करतात.मात्र बस स्थानकावरील प्रसाधनगृह,स्वच्छता  ,बस पाससंबधी किंवा चालक,वाहकांची मनमानी संबधात तक्रार करायची झाल्यास येथील आगार प्रमुखांचे दालन लावलेले तर आगार अधिक्षक कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या असल्यामुळे प्रवाशांनी तक्रार करावी कुणाकडे हा तालुक्यातील नागरीकांना पडलेला प्रश्न आहे.

       तालुक्यात अनेक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी दैनंदिन बसने येजा करतात याशिवाय प्रवाशीही मोठ्या प्रमाणात असतात.सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास बस स्थानकाला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते.प्रत्येक मार्गास बसच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्रवाशी असतात.त्यात वाहक अडेलतट्टुपणाने विद्यार्थ्यांशी वागतात.दरवाजात उभे असलेल्या विद्यार्थींनीना नुकतेच खाली ढकलुन बस मार्गस्थ केल्याचा प्रकार या आगारात घडला.मात्र याबाबत गांभिर्याने कुणी तक्रार घेत नसल्याचे वारंवार जाणवते.

     पंढरपूर यात्रे दरम्यान प्रसाधनगृह रात्रीअकरा ते साडेचार पर्यंत बंद असायचे त्याबाबत येथील प्रशासन हात वर करायचे.रात्री अपरात्री चौकशी कार्यालयातील कंट्रोलर ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.त्यांनी सुचवलेल्या वेळेत बस प्लॕटफॉर्मवर उपलब्ध होत नाही.या तक्रारींचा पाढा प्रवासी आपल्या मोबाईल नंबरसह तक्रार बुकात नोंद करतात.मात्र तक्रारींवर काय कारवाई झाली याबाबद प्रवाशांना कुठलाही खुलासा होत नाही.तक्रारींचा पाढा संपता संपलेला नाही.

    गुरुवार (ता.२१)सायंकाळी सव्वापाच वाजता आमच्या प्रतिनिधिने प्रवाशी तक्रारींची खातरजमा करण्यासाठी आगार व्यवस्थापक कार्यालयाला भेट दिली मात्र ते बंद तर अधिक्षक कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या होत्या.त्यामुळे आगार व्यवस्थापक बनकर यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन स्विकारला नाही.यावरुन कोपरगावचा कारभार सध्या रामभरोसे सुरु असल्याची जाणीव होत आहे.

प्रवाशी आणि विद्यार्थ्यांसाठी  लालपरी मोठे वरदान आहे.मात्र प्रत्येक मार्गाला शाळेय वेळेत सुटणाऱ्या बस अपुऱ्या पडत आहे.जादा बस देण्यासाठी पालकांबरोबर आमदार आशुतोष काळे यांनी वारंवार मागणी करुनही वाहतुक नियंत्रक हि बाब गांभिर्याने घेत नसल्याची शोकांतिका कोपरगावकरांच्या नशिबी आली आहे.

COMMENTS