Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर भावे यांचे निधन

पुणे ः चेहर्‍याला केवळ रंग लावणे म्हणजे रंगभूषा नाही. भूमिकेनुसार रंगांचा वापर करणे आणि त्यासाठी कमीत कमी रंग वापरणे महत्त्वाचे असते. रंगांचा अति

राहुरी विद्यापीठाच्या हरभरा वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड
आता पोलीस दादांना मिळणार त्यांच्या हक्काचं घर | LOKNews24
पवार-भुजबळांचा देखावा!

पुणे ः चेहर्‍याला केवळ रंग लावणे म्हणजे रंगभूषा नाही. भूमिकेनुसार रंगांचा वापर करणे आणि त्यासाठी कमीत कमी रंग वापरणे महत्त्वाचे असते. रंगांचा अतिरेक झाला तर नाटक फसते, अशी धारणा बाळगणारे ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे मंगळवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.  प्रभाकर भावे ब्रेनट्यूमर आजाराने ग्रस्त होते आणि त्यानंतर त्यांचे एकएक अवयव निकामी होत गेले. शुक्रवार पेठ येथे मुलीच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

COMMENTS