Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ज्येष्ठ कीर्तनकार रामायणाचार्य ह.भ.प. मधुकर महाराज जाधव यांचे निधन  

नाशिक - तालुक्यातील जोपुळ येथील ज्येष्ठ कीर्तनकार रामायणाचार्य ह.भ.प. मधुकर महाराज जाधव (जोपुळकर) (वय ५४) यांचे मंगळवारी (दि. ३०) पहाटे ४ वाजता न

स्व. एन. डी. पाटील यांच्या स्वप्नांच्या आड येणार्‍यांना धडा शिकवा : निशिकांत भोसले-पाटील
मोबाईल टॉर्च सुरु करून रुग्णावर उपचार !
बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचं पदक निश्चित.

नाशिक – तालुक्यातील जोपुळ येथील ज्येष्ठ कीर्तनकार रामायणाचार्य ह.भ.प. मधुकर महाराज जाधव (जोपुळकर) (वय ५४) यांचे मंगळवारी (दि. ३०) पहाटे ४ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. मधुकर महाराज मधुबाबा नावाने तालुक्यातील गावागावांत परिचित होते. जोपुळ, भोयेगाव, देवरगाव, कानमंडाळे, वडाळीभोईसह नाशिक शहर व जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता, तसेच मोठा शिष्य परिवारही आहे. साध्या आणि सरळ पद्धतीने संतांच्या अभंगावर निरूपण हे मधुबाबांच्या कीर्तनशैलीचे वैशिष्ट्य होते. गावागावांत होणारे अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये मधुबाबांचे नाव तालुक्यात अग्रक्रमाने घेतले जात असे. त्यांच्यावर जोपुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त तथा सचिव प्रा. अमर ठोंबरे, विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे आदींनी व नाशिक जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

COMMENTS