Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्‍येष्ठ नागरिक सारथी सन्‍मान सोहळा २०२३ चे १२ ऑगस्‍टला आयोजन 

नाशिक - प्रत्‍येक घरातील आधार..समाजाची थिंक टँक..लहानग्‍यांचे मार्गदर्शक..अन्‌ तितकेच सच्चे मित्र.. ज्‍येष्ठ नागरिक समाजात वावरतांना अशा विविध भू

आजचे राशीचक्र मंगळवार,२१ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक
बहुजन समाज पार्टीच्यावतीने इफ्तार पार्टी

नाशिक – प्रत्‍येक घरातील आधार..समाजाची थिंक टँक..लहानग्‍यांचे मार्गदर्शक..अन्‌ तितकेच सच्चे मित्र.. ज्‍येष्ठ नागरिक समाजात वावरतांना अशा विविध भूमिका बजावतात. संपूर्ण आयुष्यातील अनुभवाची शिदोरी घेऊन वाटचाल करतांना आयुष्याची ‘सेकंड इनिंग’ आनंदाने जगत असतात. त्‍यांचा हा आनंद द्विगुणित करतांना त्‍यांच्‍या कर्तृत्त्वाला सन्‍मानित करण्यासाठी ज्‍येष्ठ नागरिक सारथी सन्‍मान सोहळा २०२३ चे आयोजन केले आहे. याअंतर्गत वेगवेगळ्या ९ गटांमध्ये ज्‍येष्ठ नागरिकांना त्‍यांच्‍या गुणकौशल्‍यांनुसार सहभागी होऊन बक्षीस जिंकण्याची संधी असणार आहे.

स्‍पर्धेचे आयोजक व प्रसिद्ध बांधकाम व्‍यावसायिक सचिन पी. बागड यांनी पत्रकार परिषदेत या अभिनव उपक्रम व स्‍पर्धेविषयीची माहिती दिली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतांना श्री.बागड म्‍हणाले, कुटुंबाच्‍या, समाजाच्‍या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणार्या ज्‍येष्ठ नागरिकांना सन्‍मानित करण्यात यावे, या प्रेरणेतून स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. मनोरंजनाने भरपूर अशा या अनोख्या ज्‍येष्ठ नागरिक सन्‍मान सोहळ्यात पुरस्‍कारांसह संगीत, मौज, मनोरंजनात्‍मक खेळांचे आयोजन केले जाणार आहे. येत्‍या १२ ऑगस्‍टला दुपारी ३ वाजता मुंबई-आग्रा रोडवरील जत्रा हॉटेल जवळच्‍या श्री लक्ष्मीनारायण फेस्‍टिवल लॉन्‍स येथे हा कार्यक्रम पार पडणार असल्‍याचे श्री. बागड यांनी सांगितले.

पुरस्‍कारांसाठी विविध गट असे- प्रत्‍येक ज्‍येष्ठ नागरिकात एक खासियत असते. कुणी सदाबहार स्‍वभावाने परिचित असते. कुणी आपल्‍या काव्‍य शैलीतून, कुणाचा रुबाब भारदस्‍त असतो, तर कुणी आपल्‍या सामाजिक जाणीवेतून छाप पाडतो. आनंदाने जीवन जगतांना आपल्‍या जोडीदाराचे आयुष्य संपन्न करतांना ज्‍येष्ठ नागरिक महत्त्वाची भूमिका बजावतात.  काहींची शोलेची दोस्‍ती सर्वांना परिचित असते. त्‍यामुळे स्‍पर्धेतील गट ठरवितांना या सर्व गुणवैशिष्ट्यांचा विचार केलेला आहे. यामध्ये सदाबहार पुरस्‍कार, काव्‍य सम्राट पुरस्‍कार, रुबाबदार पुरस्‍कार, कल्‍याणकारी पुरस्‍कार, गरुड झेप पुरस्‍कार, आनंद यात्री पुरस्‍कार, याराना पुरस्‍कार, दृष्टी पुरस्‍कार, आणि जीवन साथी पुरस्‍कार असे ९ गट असतील.

ज्‍येष्ठ नागरिकांच्‍या शुभार्शिवादाने चैत्रबनचा भव्‍य शुभारंभ सोहळा – या कार्यक्रमानिमित्त ‘चैत्रबन’ या ज्‍येष्ठ नागरिकांसाठीच्‍या गृहप्रकल्‍पाचा भव्‍य शुभारंभ सोहळा उपस्‍थित ज्‍येष्ठ नागरिकांच्‍या शुभार्शिवादाने पार पडणार आहे. ज्‍येष्ठ नागरिकांच्‍या आवडीनिवडी आणि निकड लक्षात घेऊन आरोग्‍य, मनोरंजन आणि अन्‍य विविध बाबींची काळजी या प्रकल्‍पात घेण्यात आली असून, हा प्रकल्‍प निश्‍चितच सर्वांच्‍या मनात घर करेल, असा विश्‍वास श्री.बागड यांनी व्‍यक्‍त केला.

ऑनलाइन नोंदणीतून स्‍पर्धेत व्‍हा सहभागी– ज्‍येष्ठ नागरिकांना या स्‍पर्धेत विनामूल्‍य सहभागी होता येणार आहे. त्‍यासाठी त्‍यांनी केवळ गुगल फॉर्मच्‍या लिंकद्वारे प्रवेशिका नोंदवायची आहे. यामध्ये ते सहभागी होऊ इच्‍छित असलेल्‍या गटाचा आवर्जुन उल्‍लेख करायचा आहे. प्राप्त प्रवेशिकांतून परीक्षकांमार्फत छाननी व पडताळणी करुन अंतिम स्‍पर्धकांना कार्यक्रमाच्‍या ठिकाणी सादरीकरणाची संधी उपलब्‍ध केली जाणार आहे. व यानंतर अंतिम निकाल व पुरस्‍कारार्थींच्‍या नावाची घोषणा केली जाईल. जगण्यांचा आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी जास्‍तीत जास्‍त ज्‍येष्ठ नागरिकांनी स्‍पर्धेमध्ये सहभागी व्‍हावे, असे आवाहन श्री.बागड यांनी यावेळी केले आहे. प्रवेशिका नोंदविण्यासाठी http://chaitraban.in/sarathi/ या लिंकला भेट द्यावी, व अधिक माहितीसाठी 7722089888 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

COMMENTS