Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापूस व सोयाबीनची कवडीमोल दराने विक्री ; शेतकर्‍यांचा संताप

देवळाली प्रवरा : दीपावलीचा सण, सोन्या-चांदीचे गगनाला भिडलेले, भाव पण शेतकर्‍याच्या ’पांढर्‍या सोन्या’ला कवडीमोल दर मिळत आहे. पावसात भिजलेला कापूस

गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले वांद्रे सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीचे दर्शन
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्याचे शासनाचे निर्देश
लायन्स सॅफ्रॉन सफायरचे कार्य अभिमानास्पद : आ. अमोल खताळ
Displaying 1000842037.jpg

देवळाली प्रवरा : दीपावलीचा सण, सोन्या-चांदीचे गगनाला भिडलेले, भाव पण शेतकर्‍याच्या ’पांढर्‍या सोन्या’ला कवडीमोल दर मिळत आहे. पावसात भिजलेला कापूस 4 हजार 500 रुपये व चांगला कापूस 7 हजार रुपये दराने विकला जात आहे.तर खुल्या बाजारात अडीच ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन विकून शेतकरी आपली गरज भागवत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यात व्यापार्‍यांची काटामारी, मजुर मिळत नाहीत आणि पावसाचा फटका अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
अतिवृष्टी आणि शासकीय उदासीनता अशा दुहेरी संकटात सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडला असून बाजारपेठेतील मनमानीमुळे शेतकर्‍यांना कवडीमोल दराने सोयाबीन विकण्याची वेळ आली आहे. जिल्हा पणन संघाने प्रस्ताव पाठवून महिना उलटला तरीही हमीभाव केंद्रांना शासनाकडून मान्यता मिळालेली नाही. खुल्या बाजारात अडीच ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन विकून शेतकरी आपली गरज भागवत आहे.
खरीप हंगामात राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व कापसाचे क्षेत्र होते. मे, जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पीक जोमदार आले; पण काढणीच्या वेळी अतिवृष्टीने सोयाबीन व कापसाचे उभे पीक नष्ट झाले. नैसर्गिक आपत्तीमधून वाचलेला माल बाजारात घेऊन गेल्यावर व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सोयाबीनचा हमीभाव (एमएसपी) 5,328 प्रति क्विंटल जाहीर केलेला असतानाही, खुल्या बाजारात दर कोसळले आहेत. व्यापारी डागलेला आणि आर्द्रता (मॉईश्‍चर) यांचे कारण देत शेतकर्‍यांकडून अत्यंत कमी दरात सोयाबीन खरेदी करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. राहुरी तालुक्यातील अनेक बाजारपेठांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता, काही व्यापारी काटामारी तसेच क्विंटलमागे दोन किलोपर्यंत घट घेत असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास आले. यावर एका व्यापार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आमचे वजन काटे अचूक आहेत. आम्ही कोणतीही फसवणूक करत नाहीत. सध्या मिल सुरू नसल्याने दर कमी आहेत. पुढील महिन्यात भाव 8 हजार ते 8 हजार 500 पर्यंत जाऊ शकतात. सोयाबीन काढण्यासाठी एकरी सात ते आठ हजार रुपये मजूरी घेत आहे. मशिन मधून सोयाबीन काढण्यासाठी एका पोत्याचे 100 ते 150 घेतले जातात.तर कापूस वेचणीसाठी 15 ते 16 किलो दर मजूर घेत आहेत.खुल्या बाजारात कापूस 3 हजार 500 ते 4 हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे.तर सोयाबीन 3 हजार ते 4 हजार या दराने प्रति क्विंटल खरेदी केली जात आहे.

COMMENTS