महावितरण विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरण विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

अधीक्षक अभियंतांच्या दालनात आंदोलन

  बीड प्रतिनिधी - बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरण विरोधात आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांनी थेट अधीक्षक अभियंता यांच्या दालनात घुसून अधिकाऱ्

गांधी कुटुंबांचा आंबेडकर आणि आरक्षणाला विरोध : मुख्यमंत्री फडणवीस
जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत
नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक

  बीड प्रतिनिधी – बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरण विरोधात आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांनी थेट अधीक्षक अभियंता यांच्या दालनात घुसून अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. शेतकऱ्यांना रात्री वीज देण्याऐवजी दिवसा विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. थकीत वीज बिलाच्या नावाखाली महावितरण कार्यालयाने अनेक शेतकऱ्यांची वीज खंडित केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे. वारंवार महावितरण कार्यालयाकडे पाठपुरावा करून देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट महावितरण कार्यालयात घुसूनच हे आंदोलन केलं आहे. जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत केला जाणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

COMMENTS