Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराणी ताराबाई विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन उत्साहात संपन्न

 वडवणी । प्रतिनिधीवडवणी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन सोमवार, दि. 05

बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये ; महावितरणचे आवाहन
महिलांनी पकडली दारू ! संतप्त महिलांनी जे जमलं नाही पोलिसांना ते करून दाखवलं
स्वबळाच्या सुरात सुशीलकुमार शिंदेचाही सूर

 वडवणी । प्रतिनिधी
वडवणी येथील महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन सोमवार, दि. 05 जानेवारी 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक व माजी आमदार केशवराव आंधळे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बुवाजीराव शिंदे तसेच आदर्श शिक्षक मधुकरराव धस, गोरक्षनाथ मुंडे, तुकाराम राठोड, रमेश धाईतिडक, मुख्याध्यापिका शोभाताई आंधळे-डोईफोडे, उपमुख्याध्यापक मस्के सर आणि पर्यवेक्षक धाईतिडक सर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार गोरक्षनाथ मुंडे सर, तुकाराम राठोड सर, रमेश धाईतिडक सर यांना माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. स्वयंशासन दिनाच्या शिक्षिका सोनाली नाईकवाडे आणि मुख्याध्यापिका साक्षी घुगे यांनी अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिसले. अध्यक्ष केशवराव आंधळे यांनी विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षकांसारखे आदर्श होण्याचे संदेश दिले आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. अंडील जी.पी., सूत्रसंचालन अंकिता लोकरे व प्रगती फासे, आणि आभार मानले प्रीती यादव यांनी केले. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान राहिले.

COMMENTS