Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची संशोधनासाठी निवड

लोणी ः शैक्षणिक आणि औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमा अंतर्गत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग

जरे हत्याकांडाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवा
कुंकूलोळ कुटुंबियांनी उभारले स्वखर्चातून बस निवारा शेड
विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

लोणी ः शैक्षणिक आणि औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमा अंतर्गत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कु. त्रिवेणी बेंद्रे कु. पुनम भुसाळ आणि कु. श्‍वेता शेळके यांची आय.सी.ए.आर फ्लोरिकल्चरल अनुसंधान केंद्र पुणे येथे सहा महिने संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाल्यची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली.
  विद्यार्थ्यांना महाविद्यालया बरोबरच इतर शासकीय ठिकाणी संशोधन करण्याची संधी मिळत आहे ही नक्कीच विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद बाब आहे.तसेच वरील संशोधन प्रशिक्षणसाठी फ्लोरिकल्चरल अनुसंधान केंद्र पुणे चे प्रमुख शास्रज्ञ डॉ.हरीश यांचे  त्रिवेणी बेंद्रे आणि पुनम भुसाळ हिला डॉ.शिवकुमार  तर  श्‍वेता शेळके हिला डॉ.जिवन कुमार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे तर महाविद्यालयातुन त्रिवेणी बेंद्रे यांना प्रा.भाऊसाहेब घोरपडे, तसेच श्‍वेता शेळके आणि पूनम भुसाळ यांना प्रा.मिनल शेळके यांचे सहाय्यक मार्गदर्शन मिळणार आहे. या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंञीथस अण्णासाहेब म्हस्के, सहसचिव भारत घोगरे, संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, कृषी संचालक डॉ. उत्तम कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब घोरपडे आणि इतर शिक्षकांनी अभिनंदन केले.

COMMENTS