Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिनेस क्लबचे अध्यक्षपदी रोशनी भट्टड यांची निवड

कोपरगाव शहर ः लिनेस क्लब ऑफ कोपरगाव हा सदैव सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही सामाजिक ब

पोलिस भरतीचा पेपर फुटल्याची अफवा पसरविणार्‍यावर गुन्हा
महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून दमदाटी, गुन्हा दाखल
‘स्टॉक’ जमवण्यासाठी मद्यप्रेमींची धावपळ | Maharashtra Lockdown | LokNews24

कोपरगाव शहर ः लिनेस क्लब ऑफ कोपरगाव हा सदैव सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही सामाजिक बांधिलकीची भावना बाळगून ही संस्था काम करीत आहे. या संस्थेचे भारता मध्ये जवळपास दहा हजार पेक्षा जास्त सभासद असून दरवर्षी एक जानेवारीपासून पदाधिकारी यांचा नवीन कार्यकाळ हा सुरू होतो चालू वर्षीमध्ये नवीन अध्यक्ष पदी रोशनी भट्टड तर सचिव पदासाठी  डॉ. नेहा बत्रा आणि खजिनदार या पदासाठी अंजू पंजाबी यांची निवड ही वर्षाच्या सुरुवातीलाच करण्यात आली होती व त्यांचा पदग्रहण समारंभ 11 फेब्रुवारी  2024 रोजी  लिनेस क्लबच्या सभासद आणि मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमा चे प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालिका चैताली ताई काळे उपस्थित होत्या,सदर प्रसंगी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्व सदस्यांना लाभले, तर शपथ ग्रहण अधिकारी म्हणून डॉक्टर वर्षा झंवर चार्टर्ड मल्टिपल प्रेसिडेंट या होत्या. त्यांनी नवीन अध्यक्ष आणि त्यांच्या सहकारी आणि नवीन सदस्यांना शपथ देऊन त्यांच्या कामकाजाची माहिती दिली. सदर प्रसंगी लिनेस कलबच्या सर्व सदस्या आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड व त्याचे सहकारी पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी अंजली थोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS