Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आविष्कार स्पर्धेत आव्हाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

पाथर्डी ः महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी व विद्यार्थ्यांकडील अभिनव कल्पना आविष्कारित व्हाव्यात या उ

पीएसआय झालेल्या विजया कंठाळेचा आव्हाड महाविद्यालयाकडून सत्कार
आव्हाड महाविद्यालयातील बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
पीएसआय झालेल्या विजया कंठाळेचा आव्हाड महाविद्यालया कडून सत्कार

पाथर्डी ः महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी व विद्यार्थ्यांकडील अभिनव कल्पना आविष्कारित व्हाव्यात या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरवर्षी आविष्कार स्पर्धेचे आयोजन करते. ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर पदवी, व संशोधन पदवीचे (एम.फिल. व पीएच.डी.) शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी नैसर्गिक शास्त्रे, वैद्यकीय व औषध निर्माणशास्त्र, कृषी व पशुपालन, वाणिज्य व्यवस्थापन व कायदा, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि मानव्यविद्या या सहा विद्याशाखांत घेतली जाते. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालय, जिल्हा व विद्यापीठ स्तरावर केले जाते.
या स्पर्धेसाठी महाविद्यालयातून चार संशोधन प्रकल्प जिल्हास्तरावरील सादरीकरणासाठी पाठविण्यात आले होते. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, विळदघाट अहमदनगर आणि दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे 31 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता.अहमदनगर जिल्ह्यातून मनव्यविद्या या विभागातून पदवी स्तरावरील केवळ तीन संशोधन प्रकल्प विद्यापीठ स्तरासाठी निवडण्यात आले. त्यात बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे  विद्यार्थी कु. वैभवी आव्हाड आणि सिद्धांत शिरावळे या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्राचीन भारतीय त्रिगुण गुणवैशिष्ट्ये व आधुनिक पाश्‍चात्य बृहद पंच प्रारूप यांचा तुलनात्मक अभ्यास या संशोधन प्रकल्पाचा समावेश आहे. या यशासाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी वैभवी आव्हाड व सिद्धांत शिरावळे यांचे अभिनंदन केले व त्यांना विद्यापीठ स्तरावरील सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रकल्पासाठी महाविद्यालयाचे शैक्षणिक संशोधन समन्वयक प्रा.डॉ. अभिमन्यू ढोरमारे यांनी मार्गदर्शन केले.

COMMENTS