लोणी ः शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमा अंतर्गत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्र
लोणी ः शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमा अंतर्गत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कु. ज्ञानदा माणेराव हिची आय.सी.ए.आर फ्लोरिकल्चरल अनुसंधान केंद्र पुणे येथे सहा महीने संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाल्यची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.भाऊसाहेब घोरपडे यांनी दिली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबरोबरच इतर शासकीय ठिकाणी संशोधन करण्याची संधी मिळावी तसेच बाहेरील क्षेत्रातील असलेले संशोधनाची माहिती मिळावी यासाठी कृषी संलग्नित महाविद्यालयाचे संचालक डॉ.उत्तम कदम आणि प्राचार्य भाऊसाहेब घोरपडे हे नेहमीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. संशोधन प्रशिक्षणसाठी फ्लोरिकल्चरल अनुसंधान केंद्र पूणे चे डॉ.प्रशांत कंवर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे तर महाविद्यालयातुन ज्ञानदा हिला,प्रकल्प प्रकल्प प्रमुख डॉ.सरीता साबळे, डॉ.अमोल सावंत मार्गदर्शन मिळणार आहे. सदर विद्यार्थी प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ञ समिती यांच्या समोर मांडणार आहे.
COMMENTS