Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळी गावाचे सुपुत्र प्रशांत पाईक यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील टाकळी गावचे सुपुत्र प्रशांत रमेश पाईक यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक

धारणगाव, कुंभारीच्या मुस्लिम दफनभूमीचा प्रश्‍न मार्गी
सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई व्हावी
कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी देवगड नगरी सज्ज

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील टाकळी गावचे सुपुत्र प्रशांत रमेश पाईक यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक या परीक्षेत नेत्र दिपक यश संपादन केल्याने टाकळी व ब्राह्मणगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन श्री क्षेत्र दत्त देवस्थान मंदिराच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते. यावेळी टाकळी ग्रामस्थांच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रशांत पाईक यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वडील रमेश पाईक आई प्रमिला पाईक भाऊ प्रवीण पाईक भाऊजयी प्रियंका पाईक व पुतनी आर्वी प्रवीण बाईक व मामा राजेश शिंदे यांच्यासह टाकळी गावचे सरपंच संदीप देवकर, माजी सभापती सुनील देवकर, सोसायटीचे चेअरमन रामदास पाटील देवकर, ब्राह्मणगावचे सरपंच अनुराग येवले व सर्व सदस्य तसेच संजीवनीचे संचालक निलेश देवकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगनराव देवकर पोलीस पाटील राजेंद्र देवकर उपसरपंच संजय देवकर ग्रामपंचायत सदस्य शशिकांत देवकर शिवसेना गटप्रमुख महेंद्र देवकर बौध्दाचार्य शांताराम रणशूर तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील पाईक सिकंदर पठाण बाळासाहेब पाईक आदींसह अनेक ज्येष्ठ व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे पाईक परिवारातील सर्व सदस्य याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर प्रशांत पाईक यांची टाकळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी डीजे व रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी तसेच गुलालाची उधळण करत ही मिरवणूक समाज मंदिराजवळ तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी टाकळी गावातील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच संदीप देवकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रविण पाईक यांनी मानले.

COMMENTS