Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी देवळातील प्रज्ञा आणि प्रगतीची निवड

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राष्ट्रीय नॅशनल शूटिंग बॉल 42 वी स्पर्धा  (मुली/मुले) 6 ते 8 ऑक्टोबर 2023 रोजी सवाई मानसिग स्टेडिम जयपूर राजस्थान या ठ

समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्‍न पुन्हा उच्च न्यायालयात
शरद पवारांना मी मोठं मानत नाही, तुम्ही कोणी मानत असाल तर तुमचा प्रश्न; गोपीचंद पडळकरांची टीका l LokNews24
घोडेगावच्या पाणी टाकीच्या जागेचा निर्णय ग्रामसभेतच होणार

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राष्ट्रीय नॅशनल शूटिंग बॉल 42 वी स्पर्धा  (मुली/मुले) 6 ते 8 ऑक्टोबर 2023 रोजी सवाई मानसिग स्टेडिम जयपूर राजस्थान या ठिकाणी संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी देवळाली प्रवरा येथिल श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेतील कु. प्रज्ञा शरद गडाख व कु.प्रगती रामेश्‍वर गडाख या विद्यार्थिनीची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे.
तसेच विद्यालयाचे प्राध्यापक  गणेश सोपान भांड यांची महाराष्ट्र राज्य संघाच्या टीम व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धा डी डी स्पोर्ट्स या राष्ट्रीय चॅनलवर लाईव्ह प्रसारित होणार आहे. या स्पर्धेसाठी 4 आँक्टोबर रोजी महाराष्ट्राचा मुली व मुलांचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी राजस्थान कडे प्रस्थान करणार आहेत. निवड झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव  जी डी खानदेशे, माजी.आ.चंद्रशेखर कदम, संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्रजी दरे, विश्‍वस्थ जयंतजी वाघ, विश्‍वस्थ मुकेशजी मुळे, विश्‍वस्थ विश्‍वासरावजी आठरे, विद्यालयाचे प्राचार्य पोपट कडूस क्रिडाशिक्षक आर.बी.कुळधरण, राजेंद्र पुजारी सेवकवृंद आदींनी अभिनंदन करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS