Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कोपरगावच्या पाच खेळाडूंची निवड

कोपरगाव - महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनद्वारे बारामती येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत अहमदनगर संघाच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. 36 व्या राष्ट्र

संजय अमोलिक यांचा अध्यापन कार्यगौरव पुरस्काराने गौरव
शिक्षक व शिक्षकेतरांचे पगार दिवाळीपूर्वी होणार
जिया अग्रवालने बारावीत मिळवले 94 टक्के गुण

कोपरगाव – महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनद्वारे बारामती येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत अहमदनगर संघाच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. 36 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार्‍या या खेळडूंचे प्रायोजकत्व सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्वीकारले असून संघाचे टी शर्ट अनावरण अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शुभेच्छा देताना पराग संधान यांनी विवेक कोल्हे यांच्या वतीने खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कायमच कोल्हे कुटुंबीय हे खेळाडूंना वाव आणि संधी देण्यासाठी प्रयत्नशील असतात. आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू देशपातळीवर चमकला पाहिजे यासाठी विवेक कोल्हे हांचे सहकार्य व आग्रह असतो. अहमदनगर संघाच्या सात खेळाडूंनी सहभाग नोंदवला यांपैकी अक्षय आव्हाड (आंतरराष्ट्रीय खेळाडू), कन्हैया गंगुले (आंतरराष्ट्रीय खेळाडू), शमित माळी (राष्ट्रीय खेळाडू) यांची फेरनिवड करण्यात आली, तसेच अनुराधा भिंगारे (राष्ट्रीय खेळाडू),दुर्गा आव्हाड (राष्ट्रीय खेळाडू) या पाच खेळाडूंची निवड पुढील स्पर्धेसाठी झाली आहे. संगरुर येथे 22 ते 27 नोव्हेंबर 2023 होणार्‍या 36व्या राष्ट्रीय (वरिष्ठ पुरुष व महिला) अजिंक्यपद स्पर्धा पार पडणार आहे. या प्रसंगी अहमदनगर बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे, सचिव मकरंद कोर्‍हाळकर व संघाचे प्रशिक्षक डॉ. सुनील कुटे, संयोजक महेंद्र दादा नाईकवाडे, अक्षय नाईकवाडे, अशिष मेहेत्रे आदी उपस्थिती होते.

COMMENTS