Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकलव्य तायक्वांदो अकॅडमीच्या 37 खेळाडूंची निवड

अहमदनगर ः अहमदनगर शहरातील मार्कंडे संकुल येथे 14 जानेवारी रोजी झालेल्या स्पोर्ट्स तायक्वांदो असोसिएशन अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय सब ज्युनिअर, के

आंबेडकर जयंती मिरवणुकीत दगडफेक, पाच पोलिस जखमी
आजही ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर ः ढाकणे
नेवाशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार

अहमदनगर ः अहमदनगर शहरातील मार्कंडे संकुल येथे 14 जानेवारी रोजी झालेल्या स्पोर्ट्स तायक्वांदो असोसिएशन अहमदनगर आयोजित जिल्हास्तरीय सब ज्युनिअर, केडेट, ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत एकलव्य तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी 37 सुवर्ण, 17 रौप्य, 11 कांस्य एकूण 65 पदकांची कमाई केली. या सुवर्णपदक खेळाडूंमध्ये कार्तिकी वंजारे, रितू सैनी, रिया जाधव, स्वरांजली भालसिंग,अदिती धावड, संपदा नाळे, वनश्री लष्करे, आर्यन सैनी, क्षितिज पिसाळ, विराज पिसाळ, थानोज साई रेड्डी केसरा, आयुष बोरकर, अभिषेक सैनी, श्रीनिवास शिंदे, साईराज उगले, स्नेहल देशमुख, प्रांजल पोटे, श्रद्धा गायकवाड, सक्षम येणारे, प्रतीक शिंदे, हिमांशू रोमन, स्वयम सातपुते, आर्यन आंग्रे, वेदांत बचाटे, अभिषेक ओव्हळ, कुंदन बैरागी, प्रज्ञा खुडे, रोहन डोईफोडे, तेजस तांबडे, वैष्णवी बोरुडे, प्रथमेश कावळे, प्रणिता गारुडकरचा समावेश आहे. तर रौप्य पदक विजेते खेळाडूमध्ये ऋग्वेद हुलगे, वैभव कोतकर, अमित लोंढे, विराज तांबडे, सोनाली गीते, आर्या चौधरी, प्रणित गर्जे, प्रथमेश, आरव मुनोत, साईदीप आरोटे, अनुष्का चौधरी, रोहन चव्हाण, सोहम वाघमारे, आदित्य जाधव, स्वयम शिंदे, अनुष्का शिंदे, सोहम दळवी यांचा समावेश असून, कांस्यपदक विजेत्या खेळाडूंमध्ये ऋतिक काळे, आर्या हिंगे, प्रताप बोडखे, विहान भिंगारदिवे, ज्ञानेश्‍वर शिंदे, चैतन्य कोतकर, गौरी पंडित, सनाया शेख, वैभवी जगताप, आनंदी सत्रे, तुषार कावळे यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक मास्टर अल्ताफ खान, एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे सचिव गणेश वंजारे, प्रशिक्षक-योगेश बिचीतकर, सचिन मरकड, मंगेश आहेर, तेजस ढोबळे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंची एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष दिलीपदादा सातपुते, नगरसेवक विजय पठारे, स्पोर्ट्स तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष माणिकराव विधाते साहेब, सचिव घनश्याम सानप सर, प्राध्यापक संजय शिंदे, विजय येणारे, यांनी अभिनंदन केले व राज्य स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS