Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सेजल राऊत प्रथम 

श्रीगोंदा : शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आढळगाव येथील सेजल पूजा सुधीर राऊत हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वकौशल्याच्या जोरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.  ‘माझ्या गावची यात्रा’ या विषयावर सादर केलेल्या भाषणातून सेजल हिने आढळगाव पंचक्रोशीतील यात्रेची सुमारे २०० वर्षांची परंपरा, तिचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीत मांडले. यात्रेच्या निमित्ताने निर्माण होणारे सामाजिक ऐक्य, परंपरा जपण्याची भावना तसेच गावाच्या अस्मितेचे दर्शन तिच्या भाषणातून प्रभावीपणे उलगडले.  यापूर्वीही सेजल राऊत हिने ‘माझे वडील’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या वक्तृत्व प्रतिभेची चुणूक दाखवली होती.  या यशासाठी तिला शाळेचे मुख्याध्यापक उत्तरेश्वर मोहळकर तसेच सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या दैदिप्यमान यशाबद्दल ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सेजलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सेजल ही जिल्हा परिषद भोळेवस्ती येथील शिक्षक सुधीर लक्ष्मण राऊत यांची कन्या असून, तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा, कुटुंब तसेच संपूर्ण परिसराचा नावलौकिक वाढला आहे.

नाशिक विभागीय अध्यक्षपदी संदीप आल्हाट
विकास कामांमध्ये महिला अव्वलस्थानी- डॉ. प्रतिभाताई पाचपुते
श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयात प्रबोधन संवाद मेळावा उत्साहात

श्रीगोंदा : शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आढळगाव येथील सेजल पूजा सुधीर राऊत हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वकौशल्याच्या जोरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

 ‘माझ्या गावची यात्रा’ या विषयावर सादर केलेल्या भाषणातून सेजल हिने आढळगाव पंचक्रोशीतील यात्रेची सुमारे २०० वर्षांची परंपरा, तिचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीत मांडले. यात्रेच्या निमित्ताने निर्माण होणारे सामाजिक ऐक्य, परंपरा जपण्याची भावना तसेच गावाच्या अस्मितेचे दर्शन तिच्या भाषणातून प्रभावीपणे उलगडले.

 यापूर्वीही सेजल राऊत हिने ‘माझे वडील’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या वक्तृत्व प्रतिभेची चुणूक दाखवली होती.

 या यशासाठी तिला शाळेचे मुख्याध्यापक उत्तरेश्वर मोहळकर तसेच सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या दैदिप्यमान यशाबद्दल ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सेजलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सेजल ही जिल्हा परिषद भोळेवस्ती येथील शिक्षक सुधीर लक्ष्मण राऊत यांची कन्या असून, तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा, कुटुंब तसेच संपूर्ण परिसराचा नावलौकिक वाढला आहे.

COMMENTS