बीड प्रतिनिधी - तहसील कार्यालय बीड अंतर्गत कोतवाल संवर्गाच्या एकूण (27) रिक्त जागासाठी 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.00 ते 1. 30 वाजेपर्यंत एकू
बीड प्रतिनिधी – तहसील कार्यालय बीड अंतर्गत कोतवाल संवर्गाच्या एकूण (27) रिक्त जागासाठी 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.00 ते 1. 30 वाजेपर्यंत एकूण 5 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहेत.
परिक्षा उपकेंद्राचे नाव, चंपावती माध्यमिक विद्यालय, नगर रोड बीड, चंपावती इंग्लीश स्कुल, नगर रोड बीड, चंपावती प्राथमिक विद्यालय, धानोरा रोड बीड, भगवान विद्यालय, धानोरा रोड बीड आणि शिवाजी विद्यालय, कॅनॉल रोड बीड या 5 उपकेंद्रावर 1 हजार 751 उमेदवार परिक्षेला बसले असून परीक्षा केद्रावर परीक्षेच्या कालावधीत बाहेरील उपसर्ग मोठया प्रमाणावर होत असतो परीक्षार्थीनां कॉपी करण्यास मदत करणे, परीक्षेच्या काळात त्यांच्या या कृतीमुळे शांततेचा भंग होत असतो. ही शांतता भंग होऊ नये म्हणून परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 37 (1)(3)सीआरपीसीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.परीक्षा व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या दृष्टीने आणि या कालावधीत परीक्षा केद्राच्या परीसरात शांतता आणि सुव्यास्था अबाधित रहावी यासाठी हे कलम लावण्यात आले आहे. बीडचे उपविभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे 1973 चे कलम 144 मधील शक्तीचा वापर करुन आदेशीत केले आहे. परीसरातील कॉपी पुरविण्यासाठी दुरुपयोग होण्याची शक्यता लक्षात घेता परीक्षा देणा-या उमेदवारानां व परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी/ कर्मचारी यांना बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये म्हणून कोतवाल परिक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 1.30 परीक्षा कालावधी पूर्ण होईपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. शासकीय कर्तव्य पार पाडणार्या अधिकारी-कर्मचारी,परिक्षेच्या कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परिक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
COMMENTS