कोपरगाव तालुका ः ऑल इंडिया पोस्टल एस.सी-एस.टी.एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र गोवा सर्कलचे सचिव जयराम जाधव यांनी पोष्टल विभागाच्या दोन दिव

कोपरगाव तालुका ः ऑल इंडिया पोस्टल एस.सी-एस.टी.एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र गोवा सर्कलचे सचिव जयराम जाधव यांनी पोष्टल विभागाच्या दोन दिवसीय दौ-यात कोपरगांव उप विभाग पोष्ट कर्मचार्यांच्या अडी अडचणी जाणुन घेत त्यांना विविधस्तरावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी दादासाहेब साबळे होते. प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सचिव जयराम जाधव यांचा सत्कार केला. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, कोपरगाव पोस्ट कार्यालयाचे सहअधीक्षक अनंत सोनवणे, सब पोस्ट मास्तर राजेश नेतनकर यावेळी उपस्थित होते.
श्रीरामपुर शाखेचे विभागीय सचिव प्रविण शिंदे यांनी प्रास्तविक करून या भागात पोष्टल कर्मचा-यांना येणा-या अडी अडचणींची माहिती देवुन पोष्ट सेवेला प्राधान्य देत त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यांबाबत प्रत्येकांने सतर्कता बाळगावी असे सुतोवाच केले. जयराम जाधव याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, ऑल इंडिया पोष्टल एस सी-एस.टी. एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन अंतर्गत इतर अल्पसंख्यांक, विविध जाती व उच्चवर्गीय पोष्टल सभासद देखील जोडले जात असुन या सर्वच घटकांना असोसिएशनच्या मार्फत न्याय देण्यांचे काम करू. याप्रसंगी मनमाड विभागाचे श्री. वैद्य, शिंगणापुरचे सबपोष्टमास्तर रवींद्र परदेशी, कोळपेवाडीचे अमोल वाघमारे, योगेश शेजवळ, पोहेगांवचे श्री. माळी, निकीता आंबेडकर, दिशा शिंगाडे, बाळासाहेब बोरसे, आदि उपस्थित होते, सूत्रसंचालन अनिल पगारे तर राहुल गजरे यांनी आभार मानले.
COMMENTS