Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाजाने हिणवलं… नियतीने दुखावलं…परंतु परिश्रम, जिद्द व चिकाटीने तृतीयपंथी पोलिस दलाची परिक्षा झाली उत्तीर्ण 

जळगाव प्रतिनिधी - ही गाथा आहे भुसावळच्या चांद हिची चोवीस वर्षीय तृतीयपंथी. यांना सर्वोच्च न्यायालयाने महिला पुरुष व तृतीयपंथी असा वेगळा न्याय

शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका
राहुरीत सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ 
संविधानाचे यश आणि अपयश

जळगाव प्रतिनिधी – ही गाथा आहे भुसावळच्या चांद हिची चोवीस वर्षीय तृतीयपंथी. यांना सर्वोच्च न्यायालयाने महिला पुरुष व तृतीयपंथी असा वेगळा न्याय नको त्यांना समाजात समानतेची वागणुक मिळावी, म्हणून सरकारी नोकऱ्यांमध्ये  देखील समाविष्ट करून घ्यावे असा निर्णय दिला. दरम्यान भुसावळची तृतीयपंथी असलेल्या चांदने या निर्णयाचे प्रत्यक्षात रूपांतर करून दाखविले. पोलीस भरतीमध्ये धुळे येथे जाऊन मैदान मारणारी चांद हिने महाराष्ट्र राज्यातील प्रथम तृतीयपंथी पोलीस होण्याचा मान पटकाविला आहे.  चांद हिचा जन्म भुसावळ येथे झाला. आजी व आई अचानक वारल्यामुळे तीनही भावंडांची जबाबदारी तिच्यावर आली. भुसावळ रेल्वे स्टेशनवर व धावत्या गाडीत पैसे मागून उदरनिर्वाह करणाऱ्या चांदच्या जीवनात उच्च न्यायालयाच्या या एका निर्णयाने मोठा बदल घडला. तिने रोज सकाळी रेल्वे मैदानावर धावण्याचा सराव सुरू केला. सोबतच क्लास लावून सामान्य ज्ञान, गणित व ग्रामरचे शिक्षण घेतले. कधीकाळी वेश्याव्यवसायासाठी उद्युक्त केली गेलेली चांद हिने जिद्दीच्या जोरावर धुळे येथे पोलीस मैदानावर परीक्षा दिली व त्यात ती अव्वल आली आहे. 

भुसावळच्या किन्नर मठात राहणारी व यल्लमा मातेला सोडलेली किन्नर चांद ही आता लवकरच राज्याच्या पोलीस दलात दाखल होणार आहे. पोलिसांत दाखल होणारी चांद ही संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम ठरली आहे. तिच्या या तृतीयपंथी समाजातील इतर मुलींनी देखील अशाच प्रकारे शिक्षण व प्रशिक्षण घेऊन पोलीस दल अथवा शासनाच्या अन्य सेवांमध्ये रुजू व्हावे व सन्मानाने इतरांप्रमाणे जीवन जगावे, असा संदेश चांद उर्फ बेबो तडवी हिने दिला आहे.

COMMENTS