संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी येथे स्कूल बसला अपघात

Homeताज्या बातम्याअहमदनगर

संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी येथे स्कूल बसला अपघात

संगमनेर / प्रतिनिधी।४शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस पलटी झाल्याने चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार दि.४ रोजी सकाळी नऊ वा

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियमा अंतर्गत नोंदणी करावी : डॉ.उमेश पाटील
संजय आनंदकर अ‍ॅकडमीच्या 12 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
..आणि, भिल्ल वस्तीत तब्बल 50 वर्षांनी आले हक्काचे पाणी

संगमनेर / प्रतिनिधी।४
शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस पलटी झाल्याने चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार दि.४ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील चंदनापुरी घाटा जवळील आनंदवाडी परिसरात घडली.

संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील अनेक शालेय विद्यार्थी चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यालयाच्या स्कूल बसने दररोज येत असतात, आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या विद्यालयाची बस (क्रमांक एम एच १४ बी ए ८९३२ ) चंदनापुरी घाटातून आनंदवाडी मार्गे चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाकडे ३५ विद्यार्थ्यांना घेऊन जात होती.‌

यावेळी आनंदवाडी शिवारातील वळणावर एका वाहन चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचालकाला हुल दिली. बस चालकाने प्रसंगावधान राखत ही बस बाजूला घेतली. त्यात बस साईड गटारात पलटी झाल्याने बस मधील तीन ते चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे.

नीलमताई खताळ यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत दिला धीर

या अपघाताची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलमताई खताळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे, गुंजाळवाडी पठारचे किरण भागवत, किसन सरोदे, जनता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव कढणे, सेक्रेटरी अनिल कढणे, रामदास परबत, राहणे विद्यालयाचे प्राचार्य अशोक खेमनर, यांनी तात्काळ चंदनापुरी घाटातील डॉ. आर एस गुंजाळ हॉस्पिटल मध्ये भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचार पूस करून त्यांना धीर दिला.

COMMENTS