Homeताज्या बातम्याक्रीडा

आशिया चषक 2023 चे वेळापत्रक जाहीर !

आशिया चषक 2023 स्पर्धेच्या आयोजनाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. पण अखेर या स्पर्धेचे वेळापत्रक आशियाई क्रिकेट परिषदेकडून जाहीर करण्या

टीम इंडियाचा 41 धावांनी शानदार विजय
अफगाणिस्थानात होणार क्रिकेट मालिका… ‘हा’ संघ दौरा करण्याची शक्यता
अखेर कुस्ती महासंघाचे निलंबन  

आशिया चषक 2023 स्पर्धेच्या आयोजनाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. पण अखेर या स्पर्धेचे वेळापत्रक आशियाई क्रिकेट परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. 30 ऑगस्ट रोजी आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. यापूर्वी 31 ऑगस्टला ही स्पर्धा सुरू होईल, असे एसीसीने सांगितले होते. पण आता ही स्पर्धा एक दिवस आधी सुरु होईल. 30 ऑगस्टला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात मुलतानला खेळवला जाणार आहे. अंतिम सामना कोलंबोला 17 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे खेळवला जाणार आहे. याबरोबरच ज्याप्रकारे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, त्यानुसार जर सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांनी प्रवेश केला, तर या दोन संघात 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे हा सामना होईल. ही 16 वी आशिया चषक स्पर्धा वनडे क्रिकेट स्वरुपात खेळवली जाणार असून एकूण 13 सामने होणार आहेत. यातील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि अंतिम सामन्यासह 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत.

COMMENTS