मुंबई : भारतातील सर्वांत मोठी शासकीय बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्थात एसबीआयने आपल्या एमसीएलआर दरात वाढ केली आहे. हा एमसीएलआर दर 8.85 टक्क्यांवरू
मुंबई : भारतातील सर्वांत मोठी शासकीय बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्थात एसबीआयने आपल्या एमसीएलआर दरात वाढ केली आहे. हा एमसीएलआर दर 8.85 टक्क्यांवरून 8.95 टक्के करण्यात आला आहे. हा नवा एमसीएलआर दर 15 ऑगस्ट 2024 पासून लागू झालेला आहे. एमसीएलआर दरात वाढ झाल्यामुळे आता एसबीआय बँकेचे कर्ज महागणार आहे. गृहकर्ज, कार लोन, शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या ईएमआयमध्येही वाढ होणार आहे. एमसीएलआर दर वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
COMMENTS